Legal Ground for Divorce Dainik Gomantak
देश

मूल न होणे हे घटस्फोटाचं कारण ठरु शकत नाही : हायकोर्ट

Hindu Marriage Act: मूल जन्माला न येणे ही वैवाहिक जीवनातील नैसर्गिक बाब आहे असे न्यायालयाने नमूद केले.

Ashutosh Masgaunde

Impotence is not a legal ground for divorce:

मूल न होणे हा घटस्फोटाचं कारण ठरू शकत नाही अशी टिप्पणी पाटणा हाय कोर्टाने केली आहे. एका व्यक्तीने आपली पत्नी आजारपणामुळे गर्भधारणेस असमर्थ असल्याने घटस्फोटासाठी याचिका दाखले केली होती. ती फेटाळून लावताना कोर्टाने हा निर्णय दिला.

न्यायालयाने नमूद केले की, पत्नीच्या गर्भाशयात गाठ असून त्यामुळे तिला मूल होऊ शकत नाही, असे दिसते. पतीला तिला घटस्फोट देऊन दुस-या स्त्रीशी लग्न करायचे आहे जेणेकरून त्याला मूल होऊ शकेल.

न्यायमूर्ती जितेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती पी.बी. बजंत्री यांच्या खंडपीठाने सांगितले की, लग्नानंतर जोडीदारा होणारा कोणताही आजार जोडीदाराच्या नियंत्रणात नाही.

"अशा आजारपणात, दुसऱ्या जोडीदाराचे वैवाहिक कर्तव्य आहे की त्याला सहकार्य आणि मदत करणे. तसेच मूल जन्माला न येणे हे नपुंसकत्व हे घटस्फोटाचे कारण होऊ शकत नाही. मूल जन्माला न येण्याची शक्यता ही कोणाच्याही वैवाहिक जीवनाचा भाग असू शकते आणि पती-पत्नी यासाठी मूल दत्तक घेऊ शकतात.
न्यायमूर्ती जितेंद्र कुमार आणि न्यायमूर्ती पी.बी. बजंत्री

कौटुंबिक न्यायालयाने घटस्फोटासाठी या प्रकरणातील व्यक्तीची याचिका फेटाळून लावली होती. कारण तो पत्नीवरील क्रूरतेचाचे आरोप सिद्ध करण्यात अपयशी ठरला.

पतीचे आरोप

याचिकाकर्ता (पती) आणि प्रतिवादीचे (पत्नी) लग्न 2015 मध्ये झाले होते. पत्नीचे मानसिक संतुलन ठीक नाही. तिने संसार करण्यासाठी नाही तर तिचे कौमार्य तोडण्यासाठी लग्न केले आहे. त्यामुळे तिने एकत्र राहण्यास नकार दिला. असा आरोप पतीने केला होता.

पतीने पुढे असे सांगितले की, पत्नी माहेरी असताना, तिने पतीला तिच्या प्रकृतीबद्दल माहिती दिली आणि उपचारासाठी पैसे मागितले. त्यामुळे तिला उपचारासाठी नेले.

डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार, तिच्या गर्भाशयाची अल्ट्रासोनिक चाचणी करण्यात आली आणि अहवालानुसार, पत्नीच्या गर्भाशयात गाठ आढळली. त्यामुळे ती आई होण्याची शक्यता कमी होती.

पत्नीने पतीशी एकत्र राहण्याच्या नकाराशिवाय कोणत्या प्रकारचे गौरवर्तन केल्याचा पुरावा न्यायालयाला आढळला नाही.

न्यायालयाने पुढे असे निरीक्षण नोंदवले की पतीने हिंदू विवाह कायद्याच्या कलम 9 अंतर्गत वैवाहिक आयुष्य पुन्हा सुरू करण्यासाठी कोणतीही कायदेशीर पावले उचलली नाहीत. त्यामुळे यासाठी पत्नी एकटी जबाबदार नाही.

“पुराव्यांवरून असे देखील दिसून येते की जेव्हा पतीला वैद्यकीय तपासणीनंतर समजले की, पत्नीच्या गर्भाशयात गाठ आहे आणि ती मूल होण्यास असमर्थ आहे. त्यामुळे नवऱ्याला तिला घटस्फोट देऊन दुस-या स्त्रीशी लग्न करायचे आहे जेणेकरून त्याला मूल होऊ शकेल. पतीचा असा हेतू याचिका आणि पुराव्यांवरून स्पष्टपणे दिसून येतो,” असे कौटुंबिक न्यायालयाच्या निर्णयाचे समर्थन करताना म्हटले आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: सभापती तवडकर- मंत्री गावडे यांच्यातील वाद टोकाला; राजीनामा देण्याचा तवडकरांचा भाजपला इशारा

Cash For Job Scam: प्रिया यादवला तीन दिवसांची पोलीस कोठडी; डिचोली न्यायालयाचा झटका!

Goa News Updates: '...तर मी सभापतीपदाचा राजीनामा देईन' तवडकरांचा सरकारला थेट इशारा; वाचा दिवसभरातील घडाामोडी

IFFI Goa 2024: यंदाचा इफ्फी सोहळा दणक्यात! मडगाव आणि फोंड्यात लागणार सहा एक्स्ट्रा स्क्रीन्स

Government Job Scam: सरकारी नोकरीचे 'मायाजाल'! वेतन, ऐषोरामाचे आकर्षण; 'रोखी'मुळे होणारा मनस्ताप

SCROLL FOR NEXT