Hindi Din 2025 Dainik Gomantak
देश

Hindi Din 2025: मराठीनंतर जन्मलेली 'हिंदी' जगातील तिसऱ्या क्रमांकाची भाषा कशी झाली?

Origin of Hindi language : हिंदी ही भारतीय उपखंडातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तीची पाळेमुळे इंडो-आर्यन भाषासमूहाशी निगडित आहेत. हिंदी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला.

Sameer Panditrao

हिंदी ही भारतीय उपखंडातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. तीची पाळेमुळे इंडो-आर्यन भाषासमूहाशी निगडित आहेत. हिंदी भाषेचा उगम संस्कृत भाषेतून झाला. हिंदी हा शब्द फारसीतील हिंद या शब्दापासून आला आहे, ज्याचा अर्थ सिंधु नदीचा प्रदेश असा होतो. हिंदी ही देवनागरी लिपीत लिहिली जाते.

हिंदी आज जगातील तिसऱ्या क्रमांकाची सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. ६० कोटींपेक्षा अधिक लोक ही भाषा मातृभाषा म्हणून वापरतात. लहंदा, पंजाबी, सिंधी, गुजराती, मराठी, हिंदी, ओडिया, बंगाली, असमिया या नऊ क्षेत्रीय भाषा प्राकृत भाषेतून निर्माण झाल्या. भारतात बोलल्या जाणाऱ्या हिंदीच्या पाच उपभाषा आहेत. पश्चिमी हिंदी, पूर्वी हिंदी, राजस्थानी हिंदी, पहाडी हिंदी, बिहारी हिंदी या त्या पाच उपभाषा होत.

भारत स्वतंत्र झाल्यानंतर घटना परिषदेने १४ सप्टेंबर १९४९ रोजी हिंदीस राजभाषा म्हणून मान्यता दिली. त्यामुळे तो दिवस भारतभर ‘हिंदी दिन’ म्हणून साजरा केला जातो. भारतीय घटनेच्या कलम ३४३ (१) प्रमाणे देवनागरी लिपीत लिहिल्याजाणाऱ्या हिंदी भाषेस राजभाषा म्हणून घोषित करण्यात आले आहे.

मराठी ही हिंदीपेक्षा बरीच जुनी भाषा आहे. सर्वात जुने मराठीशी संबंधित शिलालेख सुमारे २,२०० वर्षांपूर्वीचे आहेत. याउलट, हिंदी ही खूपच अलीकडील विकास आहे, १८ व्या शतकाच्या उत्तरार्धात तिच्या आधुनिक स्वरूपात विकसित झाली आणि १९५० मध्ये तिला अधिकृत दर्जा मिळाला

प्रसार

हिंदी भाषेचा प्रसार कसा झाला यामागे अनेक कारणे आहेत. हिंदी ही भारतीय उपखंडातील सर्वाधिक बोलली जाणारी भाषा आहे. पूर्वापार व्यापाराच्या कारणामुळे हिंदी भाषेशी इतर राज्यांचा संबंध होता. ब्रिटिश साम्राज्याच्या हे प्रमाण जास्त वाढले. त्यावेळी एकीकरणाच्या प्रक्रियेमध्ये भारतातील विविध भाषिक समुदायांमध्ये संवाद साधण्यासाठी हिंदीला एक माध्यम म्हणून वापरले गेले.

खासकरून शिक्षण आणि प्रशासन या विभागातून हिंदीचा वापर वाढला. दरम्यान हिंदी साहित्य आणि चित्रपट निर्मिती उद्योगामुळे हिंदी भाषेचा प्रसार वाढला. वाढत्या उद्योगधंद्यामुळे आणि नोकरीच्या संधींमुळे परप्रांतीय हिंदी भाषिकांचा टक्का सर्वत्र वाढला. अशा अनेक कारणांनी हिंदी भाषेने आपले पाय घट्ट रोवले. देवनागरी लिपीमुळे मराठी लोकांना ही भाषा अवगत व्हायला वेळ लागला नाही.

तिसऱ्या भाषेचा वाद काय आहे?

नुकताच महाराष्ट्रात तिसऱ्या भाषेवरून वाद झालेला आपण पाहिला. यात केंद्रभागी हिंदी भाषाच होती. नवीन शैक्षणिक धोरणानुसार मुलांनी शालेय शिक्षणात स्थानिक भाषा, इंग्रजी, आणि एक अतिरिक्त भारतीय भाषा शिकावी असे सूचित केलेले आहे. या धोरणानुसार आपण तिसरी भाषा कोणतीही निवडू शकतो.

या नवीन धोरणाचा भाग म्हणून, १६ एप्रिल २०२५ रोजी महाराष्ट्र सरकारने मराठी आणि इंग्रजी माध्यमाच्या शाळांमध्ये पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी हिंदीला तिसरी भाषा म्हणून अनिवार्य केले.

हा आदेश जारी झाल्यानंतर राजकीय नेते आणि मराठी भाषा कार्यकर्त्यांनी तीव्र विरोध केला. यासाठी दक्षिणेतल्या राज्यांनी पाळलेले दोन भाषी धोरण उदाहरणादाखल पुढे करण्यात आले. सरकार मागच्या दारातून हिंदी सक्ती करण्याचा प्रयत्न करत आहे असे आरोप यात करण्यात आले. या विरोधानंतर शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले सांगितले की हिंदी भाषा अनिवार्य नसेल आणि पर्यायी भाषा शिकण्याची सोय दिली जाईल, पण हे धोरण नंतर स्थगित करण्यात आले.

सध्याची स्थिती

सरकारने नवीन अभ्यासक्रम लागू केला आहे, ज्यामध्ये काही वर्गांसाठी हिंदी भाषा अनिवार्य करण्याचा उल्लेख आहे. मात्र, विरोध तीव्र असल्याने, सरकारला या धोरणाबद्दल अधिक स्पष्ट भूमिका घ्यावी लागत आहे आणि विद्यार्थ्यांसाठी हिंदीऐवजी इतर भाषा शिकण्याचे पर्याय उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

थोडक्यात, महाराष्ट्र सरकार आणि राजकीय पक्षांमधील हा भाषा विवाद हिंदी भाषेच्या लादणीवरून सुरू झाला असून, मराठी भाषेची संस्कृती आणि अस्मिता जपण्यासाठी हा लढा सुरू आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हातचलाखीचा मास्टर! मासे चोरण्याचा 'जुगाड' सोशल मीडियावर व्हायरल, नेटकऱ्यांनी घेतली शाळा; म्हणाले, ''गजब का टोपीबाज है''

Mitchell Marsh Drinking Beer: वादग्रस्त बोलणं पडलं महागात! फक्त '6 बिअर' बोलल्यामुळे मिचेल मार्शला संघातून 'डच्चू'! काय आहे नेमकं प्रकरण? Watch Video

Goa Police Constable Fraud: पोलिस कॉन्स्टेबलचा भांडाफोड! आंध्र प्रदेशातील बनावट जन्म प्रमाणपत्राच्या आधारे मिळवली नोकरी; पणजी पोलिसांत फसवणुकीचा गुन्हा

Gold Silver Rate: सोन्या-चांदीच्या दरात मोठा उलटफेर! सोन्याच्या दरात घसरण, तर चांदीचे दर 'जैसे थे'; 10 ग्रॅम सोन्याचा भाव किती?

Horoscope: पैसा आणि नोकरीचे संकट! मंगळाच्या अधोगतीमुळे 'या' राशींची आर्थिक स्थिती ढासळणार! सावध राहा

SCROLL FOR NEXT