Viral Video Dainik Gomantak
देश

Video: चोरट्याची फजिती! स्कूटी घसरली, हेल्मेट पडलं अन् स्वतःही पडला; सोशल मीडियावरील 'हा' व्हिडिओ एकदा बघाच

Funny Theft Video: सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चोरी करताना दिसत आहे. एका ठिकाणी काही ट्रे ठेवलेले आहेत.

Manish Jadhav

Funny Theft Video: जगात कुठेही काही मनोरंजक किंवा लक्ष वेधून घेणारी घटना घडली, की ती लगेच कोणीतरी रेकॉर्ड करतो किंवा सीसीटीव्हीमध्ये (CCTV) कैद होते. त्यानंतर ते व्हिडिओ सोशल मीडियावर (Social Media) पोस्ट केले जातात आणि जर ते व्हायरल झाले, तर जगभरात पाहिले जातात. तुम्हीही रोज सोशल मीडियावर असे अनेक व्हायरल व्हिडिओ (Viral Video) पाहत असाल, त्यापैकी काही व्हिडिओ इतके मजेशीर असतात की हसू आवरणे कठीण होते. सध्या असाच एक व्हिडिओ इंटरनेटवर धुमाकूळ घालत आहे.

आधी हा व्हिडिओ पाहा!

व्हायरल व्हिडिओमध्ये काय दिसले?

दरम्यान, सध्या व्हायरल होत असलेल्या व्हिडिओमध्ये एक व्यक्ती चोरी करताना दिसत आहे. एका ठिकाणी काही ट्रे ठेवलेले आहेत. त्यापैकी एक ट्रे तो व्यक्ती उचलतो आणि आपल्या स्कूटीवर (Scooty) ठेवतो. ट्रे घेऊन तिथून पळून जाण्याच्या प्रयत्नात असतानाच, त्याची स्कूटी थोडी घसरते आणि ट्रेमधील सर्व सामान खाली पडते.

तो व्यक्ती कसेबसे स्कूटीला सांभाळत ट्रे पुन्हा उचलून ठेवतो, पण तेवढ्यात त्याचे हेल्मेट (Helmet) खाली पडते. हेल्मेट घेण्यासाठी तो वाकतो, तोच त्याची स्कूटी (Scooty) खाली पडते. यानंतर तो स्कूटी उचलतो आणि तिथून पळून जाण्याचा प्रयत्न करतो, पण थोड्याच अंतरावर पाणी असल्यामुळे त्याची स्कूटी पुन्हा घसरते आणि तो पुन्हा खाली पडतो.

हा व्हिडिओ इन्स्टाग्रामवर unknown_5ukoon_04 नावाच्या अकाउंटवरुन पोस्ट करण्यात आला आहे. बातमी लिहेपर्यंत हा व्हिडिओ मोठ्या संख्येने लोकांनी पाहिला आहे

युझर्सच्या भन्नाट प्रतिक्रिया

हा व्हिडिओ पाहून लोक प्रचंड हसत आहेत आणि त्यावर मजेशीर कमेंट्सही करत आहेत. एका युझरने कमेंट करत लिहिले, "काय चोर बनेल रे तू?" दुसऱ्या युझरने लिहिले, "बुरे काम का बुरा नतीजा!" तर तिसऱ्या युझरने म्हटले, "भावाचं पहिल्यांदाच चोरीचं काम असावं."

या व्हिडिओमुळे लोकांचे चांगलेच मनोरंजन झाले असून, चोरीचा प्रयत्न करणाऱ्या व्यक्तीची झालेली फजिती पाहून अनेकांनी हसून-हसून लोटपोट झाल्याच्या प्रतिक्रिया दिल्या आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Duleep Trophy 2025: 13 चौकार, 3 षटकार! आयुष बडोनीचा 'डबल धमाका'; द्विशतक ठोकून टीमला पोहोचवले उपांत्य फेरीत

Viral Video: चिमुकल्याला पाठीवर बसवून डॉल्फिनची 'जलसफर'! हृदयस्पर्शी व्हिडीओ तूफान व्हायरल; तुम्ही पाहिलाय का?

Black Money Act: ‘ब्लॅक मनी’ कायद्यात मोठा बदल! ‘या’ लोकांसाठी दंड आणि शिक्षेचा धोका संपला; केंद्र सरकारचा मोठा निर्णय

Akbar Hajj History: बैराम खान सहस्रलिंग सरोवरावर पोचला, बंडखोर अफगाणांनी हल्ला केला; बादशाह अकबर व हज यात्रेकरू

Upcoming Smartphones: सप्टेंबरमध्ये स्मार्टफोन्सचा धमाका! iPhone 17 सिरीजपासून Samsung Galaxy S25 FE पर्यंत धमाकेदार मॉडेल्स होणार लॉन्च

SCROLL FOR NEXT