Upcoming Smartphones: सप्टेंबरमध्ये स्मार्टफोन्सचा धमाका! iPhone 17 सिरीजपासून Samsung Galaxy S25 FE पर्यंत धमाकेदार मॉडेल्स होणार लॉन्च

Upcoming Smartphone Launches in September: आता सप्टेंबर महिना आणखी धमाकेदार असणार आहे. कारण, या महिन्यात अनेक बहुप्रतिक्षित आणि हाय-प्रोफाइल स्मार्टफोन्स लॉन्च होण्यासाठी सज्ज आहेत.
iPhone 17 Design And Camera Upgrades
iPhone 17 Dainik Gomantak
Published on
Updated on

Upcoming Smartphones 2025: ऑगस्ट (2025) महिना संपत आला असून या महिन्यात अनेक धमाकेदार स्मार्टफोन बाजारात दाखल झाले, ज्यात पिक्सेल 10 सिरीज, वीवो व्ही60, ओप्पो के13 टर्बो आणि इंफिनिक्स जीटी 30 सारख्या डिव्हाइसेसचा समावेश होता. पण स्मार्टफोनप्रेमींसाठी आता सप्टेंबर महिना आणखी धमाकेदार असणार आहे. कारण, या महिन्यात अनेक बहुप्रतिक्षित आणि हाय-प्रोफाइल स्मार्टफोन्स लॉन्च होण्यासाठी सज्ज आहेत. यात अ‍ॅपल आणि सॅमसंग सारख्या जागतिक ब्रँड्ससह भारतीय कंपनी लावा देखील आपले नवीन मॉडेल लॉन्च करेल. चला तर मग जाणून घेऊया सप्टेंबरमध्ये कोणते स्मार्टफोन्स लॉन्च होणार आहेत.

iPhone 17 सीरिज

दरम्यान, प्रत्येक वर्षी सप्टेंबरच्या दुसऱ्या आठवड्यात अ‍ॅपल आपली नवी iPhone सिरीज लॉन्च करते आणि यंदाही हीच अपेक्षा आहे. iPhone 17 सिरीजमध्ये चार नवीन मॉडेल्सचा समावेश असू शकतो, ज्यामध्ये iPhone 17, iPhone 17 Air, iPhone 17 Pro आणि iPhone 17 Pro Max. या सिरीजमधील iPhone 17 Pro आणि Pro Max मध्ये यावेळी सर्वात मोठा बदल पाहायला मिळू शकतो. या मॉडेल्समध्ये कॅमेराचा लेआउट बदलून तो आडव्या (horizontal) डिझाइनमध्ये आणला जाण्याची शक्यता आहे. याशिवाय, कंपनी टायटेनियम डिझाइनऐवजी ‘हाफ-अल्युमिनियम आणि हाफ-ग्लास’ बॉडीचा पर्याय देऊ शकते, ज्यामुळे फोनचा अनुभव अधिक प्रीमियम होईल.

iPhone 17 Design And Camera Upgrades
Redmi Smartphone: आता फोन चार्जिंगचं नो टेन्शन, रेडमी लॉन्च करणार 9000 mAh बॅटरी असलेला स्मार्टफोन

याशिवाय, iPhone 17 Air हे iPhone 16 Plus च्या जागी लॉन्च केले जाऊ शकते आणि हा आतापर्यंतचा सर्वात हलका आयफोन असण्याची शक्यता आहे. बेस मॉडेल असलेल्या iPhone 17 ला मागील वर्षीच्या iPhone 16 सारखाच लूक मिळेल, पण यात नवीन प्रोसेसर, 24 एमपीचा अपग्रेडेड सेल्फी कॅमेरा आणि 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट असलेला ProMotion LTPO AMOLED डिस्प्ले असेल.

Samsung Galaxy S25 FE

सॅमसंग (Samsung) आपली 'फॅन एडिशन' (FE) सिरीज सहसा सप्टेंबर महिन्याच्या मध्यात लॉन्च करते. याच अंदाजानुसार, Galaxy S25 FE सुद्धा या महिन्यात लॉन्च केला जाऊ शकतो. यात Exynos 2400 प्रोसेसर दिला जाण्याची शक्यता आहे. तसेच, कॅमेरा सेटअपमध्ये 50 एमपीचा प्रायमरी सेन्सर, 8 एमपीचा टेलीफोटो लेन्स (3x झूम, OIS सपोर्ट) आणि 12 एमपीचा अल्ट्रा-वाईड कॅमेरा समाविष्ट असेल. याशिवाय, या फोनमध्ये 6.7 इंचाचा Dynamic AMOLED 2X डिस्प्ले असेल, जो 120 हर्ट्झ रिफ्रेश रेट आणि 1080 x 2340 पिक्सल रिझोल्यूशनला सपोर्ट करेल. याची बॅटरी 4,900 mAh ची असेल, जी मागील मॉडेल (4,700 mAh) पेक्षा थोडी मोठी आणि अधिक दमदार असेल.

iPhone 17 Design And Camera Upgrades
Infinix Smartphone Launch: इन्फिनिक्सचा मोठा धमाका! परवडणाऱ्या किमतीत लॉन्च केला धमाकेदार स्मार्टफोन; iQOO-Poco ला देतो टक्कर

Lava Agni 4

त्याचवेळी, भारतीय कंपनी लावा देखील सप्टेंबर महिन्यात आपली नवीन Agni 4 सिरीज लॉन्च करु शकते. अलीकडेच समोर आलेल्या लीक्समधून या फोनच्या डिझाइनची झलक मिळाली. यावेळी कंपनी मागील मॉडेलमधील सेकंडरी डिस्प्ले काढून त्याऐवजी आडवा (horizontal) कॅमेरा मॉड्यूल देऊ शकते. फोनमध्ये AMOLED डिस्प्ले कायम राहण्याची अपेक्षा आहे. यात नवीन MediaTek 8350 प्रोसेसर आणि तब्बल 7,000 mAh ची मोठी बॅटरी दिली जाऊ शकते, जी फोनला दीर्घकाळ टिकवून ठेवेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com