गेल काही दिवसांचा विचार करता देशातील अनेक भागात कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याचे चित्र आहे. याबाबत सतर्कता बाळगत आज सर्वाच्च न्यायालयाने ही प्रवाशांकडून कोरोना फैलाव होणार नाही यासाठी काळजी घेणे आवश्यक असल्याच मत व्यक्त केले आहे. तर केंद्र सरकार ही आता सतर्क झाले असून कोरोना स्थितीनुसार नवी नियमावली ही सादर केली जात आहे. (highest corona spread in three months in india )
देशात गेल्या 24 तासांत 4257 नवीन रुग्ण आढळले आहेत. यामूळे देशातील करोनाबाधितांची संख्या या महिन्यात 4 हजारांच्या पुढे गेली आहे. 2 जून रोजी देशात 4041 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता. काल शनिवारी, 15 करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची झाली आहे. तर 2612 रुग्ण बरे झाले आहेत. तसेच सध्या 22 हजार 691 करोनाबाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत. देशात आतापर्यंत 4.31 कोटी लोकांना करोनाची लागण झाली आहे. त्यापैकी 4.26 कोटी लोक बरे झाले असून 5.24 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.
देशातील केरळ राज्याने आता सर्वांचे लक्ष खेचून घेतले आहे. कारण केरळमधील प्रत्येक 100 चाचण्यांमागे 10 रुग्ण करोनाबाधित असल्याचीबाब समोर येत आहे. यामूळे पुन्हा देशाला चौथ्या लाटेला सर्वांना सामोरे जावे लागणार का असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. केरळमध्ये करोनाबाधितांची संख्या अधिक आहे. शनिवारी केरळमध्ये 1456 नवे करोना रुग्ण आढळून आले आहेत. तर 7 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या केरळमध्ये 7427 करोनाबाधितांवर उपचार सुरु आहेत. प्रत्येक 100 चाचण्यांमागे 10 करोनाबाधित आढळून येत आहे. परिणामी केरळचा करोनाबाधिताचा दर 9.87 टक्क्यांपर्यंत पोहचला आहे.
कोरोना वाढीचा आढावा घेता महाराष्ट्रास विचार करण्यास भाग पाडणारी आकडेवारी समोर येत आहे. कारण नवीन रुग्णांच्या बाबतीत महाराष्ट्र दुसऱ्या क्रमांकावर येतो आहे. देशात कोरोना रुग्णांच्या बाबतीत अव्वल ठरलेल्या महाराष्ट्रात पुन्हा एकदा संसर्गाचा वेग वाढला आहे. राज्यात शनिवारी 1357 नवीन रुग्ण आढळून आले आहेत. तर 595 रुग्ण बरे झाले असून एका करोनाबाधिताचा मृत्यू झाला आहे. सध्या 5888 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. करोनाचा वाढता प्रसार पाहता राज्यात पुन्हा एकदा मास्कसक्ती करण्यात येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.