पारा पुन्हा 47 अंशांच्या पुढे; 'या' ठिकाणी मुसळधार पाऊसाची शक्यता

काही दिवसांच्या दिलासानंतर देशाचे उत्तर-पश्चिम आणि मध्य भाग पुन्हा उष्णतेच्या लाटेमध्ये सापडला आहे.
Monsoon Update
Monsoon UpdateDainik Gomantak

काही दिवसांच्या दिलासानंतर देशाचे उत्तर-पश्चिम आणि मध्य भाग पुन्हा उष्णतेच्या लाटेमध्ये सापडला आहे. अनेक गावे तसेच शहरांमध्ये तापमान 44 अंश सेल्सिअसच्या वर पोहोचले आहे. राजस्थान, जम्मू, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, झारखंड, विदर्भ, दक्षिण उत्तर प्रदेश आणि उत्तर मध्य प्रदेशात पुढील दोन ते तीन दिवस उष्णतेची लाट (Heat wave) येण्याची शक्यता असल्याचे हवामान खात्याने शनिवारी सांगितले आहे. (Mercury again at 47 degrees Chance of torrential rain at this place)

Monsoon Update
सत्येंद्र जैन यांना मोठा झटका, चौकशीदरम्यान वकील ठेवण्याच्या आदेशाला स्थगिती

राजस्थानच्या गंगानगरमध्ये शनिवारी 47.5 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद करण्यात आले आहे. हरियाणाच्या हिस्सार आणि उत्तर प्रदेशच्या बांदामध्ये तापमान 46.8 अंश सेल्सिअसवर होते. 4-5 जून रोजी राजस्थान आणि उत्तर-पश्चिम मध्य प्रदेशात 30-40 किमी प्रतितास वेगाने वारे वाहू शकतात असे हवामान खात्याने वर्तवले आहे.

शुक्रवारी महाराष्ट्राच्या विदर्भातील चंद्रपूरमध्ये 46.4 अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद केली आहे. देशाच्या उत्तर-पश्चिम आणि मध्य भागातील 40 शहरांमध्ये कमाल तापमान 44 अंश सेल्सिअसच्या पुढे गेले असल्याचे सांगण्यात आले आहे. हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या बहुतांश भागात कमाल तापमानात दोन अंश सेल्सिअसने वाढ होऊ शकते.

Monsoon Update
महिलेशी गैरवर्तन केल्याप्रकरणी द्वारका डीसीपींना पदावरुन हटवले, तपास सुरु

वायव्य भारताला 24 मे रोजी आलेल्या वादळानंतर संपूर्ण प्रदेशात उष्णतेच्या लाटेपासून थोडा दिलासा मिळाला होता. दरम्यान, हवामान खात्याने 7 जूनपासून दक्षिण द्वीपकल्पात पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. ईशान्य भारत आणि बंगालच्या उप-हिमालयीन प्रदेशात आणि सिक्कीममध्ये पुढील पाच दिवसांत पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला.

07 जूनपासून, दक्षिण द्वीपकल्पीय भारतात पावसाच्या हालचाली वाढण्याची देखील शक्यता आहे. पुढील पाच दिवसांत ईशान्य भारत, सिक्कीम आणि उप-हिमालयीन पश्चिम बंगालमध्ये मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली आहे. एवढेच नाही तर पुढील दोन ते तीन दिवसांत उत्तर-पश्चिम आणि मध्य भारताच्या विविध भागात उष्णतेची लाट येऊ शकते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com