COVID Updates in India Dainik Gomantak
देश

Covid19 In India: कोरोना स्थितीवर उच्चस्तरीय बैठक, 500 नमुन्यांची जीनोम सिक्वेन्सिंग

देशभरातील 21,097 रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल

Akshay Nirmale

Covid19 In India: जगभरातील काही देशांमध्ये कोरोना रूग्णांमध्ये पुन्हा झपाट्याने वाढ होऊ लागल्याच्या पार्श्वभुमीवर देशात शनिवारी वरीष्ठ सरकारी अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय आढावा बैठकी झाल्याचे समजते. सूत्रांच्या माहितीनुसार या बैठकीत या वर्षी डिसेंबरमध्ये गोळा केलेल्या सुमारे 500 नमुन्यांचे जीनोम सीक्वेन्सिंग सध्या देशभरातील भारतीय SARS-Cov-2 जीनोमिक्स कन्सोर्टियम (INSACOG) प्रयोगशाळांमध्ये केली जात असल्याची माहिती आहे.

यापुर्वी 22 डिसेंबर रोजीच्या आढावा बैठकीत देशातील कोविड-19 च्या स्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि पंतप्रधानांनी जारी केलेल्या निर्देशांचे पालन करण्यासाठी पंतप्रधानांचे प्रधान सचिव पी. के. मिश्रा यांच्यासह वरिष्ठ अधिकारी आणि तज्ज्ञांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक झाली आहे. या बैठकीदरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या अधिकार्‍यांनी माहिती दिली की, वाणिज्य मंत्रालयाला चीनमध्ये होणाऱ्या औषधी उत्पादने आणि उपकरणांच्या निर्यातीवर लक्ष ठेवण्यास सांगण्यात आले आहे.

मिश्रा यांना चीन, जपान, दक्षिण कोरिया, सिंगापूर, ब्राझीलसह काही देशांमध्ये कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या प्रकरणांमध्ये झपाट्याने वाढ झाल्याने जगभरातील या साथीच्या आजारामुळे उद्भवलेल्या परिस्थितीची माहिती देण्यात आली. केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया यांनी 23 डिसेंबर रोजी डिजिटल माध्यमातून कोविड-19 वर राज्यांच्या आरोग्य मंत्र्यांसोबत आढावा बैठक घेतली. त्यात कोविडशी संबंधित वर्तणुकीबद्दल जागरूकता पसरवणे, देशभरात चाचणीचा वेग वाढवणे, लसीचा प्रतिबंधात्मक डोस जलद करणे यासह निगराणी वाढवणे यावर मुख्य भर देण्यात आला आहे.

यावेळी पंतप्रधानांच्या सूचनेनुसार 21,097 रुग्णालयांमध्ये मॉक ड्रिल घेण्यात आल्या, त्यापैकी 16,108 सरकारी संस्था होत्या. तसेच कोविड -19 चाचणीसाठी सुमारे 1,716 आंतरराष्ट्रीय उड्डाणांच्या प्रवाशांवर लक्ष ठेवण्यात आले आणि 5,666 नमुने गोळा करण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Stokes- Archer Fight: अ‍ॅशेसमध्ये हाय-व्होल्टेज ड्रामा! बेन स्टोक्स आणि जोफ्रा आर्चर भरमैदानात भिडले Watch Video

Goa Politics: हळदोण्यात काँग्रेसला घरचा आहेर! ॲड. कार्लुस फारेरांच्या 40 शिलेदारांची भाजपमध्ये 'एन्ट्री'

Goa Politics: खरी कुजबुज; गिरदोलीत भाजप विरोधात भाजप?

Goa News Live: अन्वर शेख हत्या प्रकरण; सर्व संशयितांची निर्दोष सुटका

Cooch Behar Trophy: गोव्याचा युवा संघ सुस्तावला, कुचबिहार क्रिकेट सामन्यात चंडीगड आघाडीच्या दिशेने

SCROLL FOR NEXT