Yasin Malik Dainik Gomantak
देश

यासिन मलिकच्या शिक्षेविरोधात दिल्ली-NCR मध्ये हाय अलर्ट, दहशतवादी हल्ल्याची शक्यता

यासिन मलिकला (Yasin Malik) टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली आणि एनसीआरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे.

दैनिक गोमन्तक

यासिन मलिकला टेरर फंडिंग प्रकरणी जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर देशाच्या गुप्तचर यंत्रणांनी दिल्ली आणि एनसीआरमध्ये हाय अलर्ट जारी केला आहे. यासिन मलिकच्या शिक्षेच्या निषेधार्थ राजधानी दिल्लीत दहशतवादी हल्ला होऊ शकतो, असे सुरक्षा यंत्रणांचे म्हणणे आहे. सुरक्षा एजन्सींच्या अधिकाऱ्यांशिवाय दिल्ली पोलिसांना सुमारे 6 ते 7 अलर्ट प्राप्त झाले आहेत.

दरम्यान, जम्मू-काश्मीरमध्ये (Jammu and Kashmir) दहशतवादी फंडिंग केल्याप्रकरणी यासिन मलिकला (Yasin Malik) आज दिल्लीतील एनआयए न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली. तसेच दहा लाख रुपयांच्या दंडाचा देखील आदेश दिला आहे. म्हणजेच यासिन मलिकचे उर्वरित आयुष्य दिल्लीतील (Delhi) तिहार तुरुंगात व्यतीत होणार आहे. दरम्यान, दिल्ली आणि एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्वभूमीवर देशाच्या गुप्तचर विभागाने हाय अलर्ट जारी केला आहे.

दिल्ली पोलिसांना (Police) गुप्तचर विभागाकडून मिळालेल्या माहितीनुसार, दिल्लीच्या तिहार तुरुंगात बंद असलेला फुटीरतावादी नेता यासिन मलिकच्या शिक्षेच्या निषेधार्थ दिल्ली एनसीआरमध्ये दहशतवादी हल्ला केला जाऊ शकतो. दिल्ली आणि एनसीआर दहशतवाद्यांच्या निशाण्यावर आहे.

सीमेपलीकडून दहशतवादी हल्ल्याची योजना

ज्या दिवशी यासिन मलिकला एनआयए कोर्टाने दोषी ठरवले होते, त्याच दिवसापासून दिल्ली पोलीस आणि सुरक्षा यंत्रणांना अलर्ट जारी करण्यात आला. यासिन मलिकला दोषी ठरवल्याच्या निषेधार्थ, त्याचे कट्टर समर्थक आणि त्याच्या जवळच्या दहशतवादी संघटनांचे प्रमुख दिल्लीत सीमेपलीकडून दहशतवादी हल्ल्याची योजना आखत आहेत.

मलिक जेल क्रमांक 7 च्या वॉर्डात एकटाच राहतो

यासिन मलिकला जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर तिहार तुरुंग प्रशासनाने महत्त्वपूर्ण बैठक घेतली. ज्यामध्ये तिहार प्रशासनाने यासिन मलिकच्या सुरक्षेबाबत सूचना दिल्या आहेत. सध्या यासिन मलिक जेल क्रमांकाच्या एका वॉर्डात एकटाच राहतो. मात्र आता जन्मठेपेची शिक्षा सुनावल्यानंतर त्याच्यावर सीसीटीव्हीच्या मदतीने बारकाईने नजर ठेवण्यात येणार आहे. त्याचे जेल किंवा वॉर्ड स्थलांतरित केले जाणार की, नाही याबाबत सध्या निर्णय झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Opinion: संपूर्ण गोव्याचे, गोवेकरांच्या अस्तित्वाचे, मुलाबाळांच्या भवितव्याचे प्रश्न कोण विचारणार?

Weekly Horoscope: जाणून घ्या येणाऱ्या आठवड्यातील ग्रह-नक्षत्रांची स्थिती; काही राशींना शुभ, तर काहींना सतर्कतेचा इशारा

Mapusa Fire Incident: म्हापशात आगीचे थैमान, शॉर्ट सर्किटमुळे दुर्घटना; 3 लाखांचे नुकसान

Goa Live News: मॅन्ग्रोव्ह डे निमित्त, सरकारी हायस्कूल मर्सेसने 'मातृशक्ती क्लब'चे केले उद्घाटन

Thailand Cambodia Conflict: 32 ठार, 58 हजार स्थलांतरीत; थायलंड-कंबोडिया सीमेवरील तणाव, न्यूयॉर्कमध्ये बंद दाराआड बैठक

SCROLL FOR NEXT