Gujarat rain news 2022 Dainik Gomantak
देश

दक्षिण गुजरातमध्ये मुसळधार पाऊस; 700 हून अधिक लोकांचे स्थलांतर

400 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

दैनिक गोमन्तक

पावसाने उत्तर भारतात काहीशी उसंत दिली घेतली असली तरी गुजरातमध्ये मात्र धुमाकूळ घातला आहे. गुजरात मधील दोन जिल्ह्यातून सुमारे 700 लोकांना आत्तापर्यंत स्थलांतर करावे लागले आहे. तसेच भारतीय हवामान विभागाने पुढील पाच दिवसांत दक्षिण गुजरातमधील डांग, नवसारी आणि वलसाड जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिवृष्टीचा अंदाज वर्तवला आहे.

भारतीय हवामान विभागाच्या अधिकाऱ्यांनी अशी माहिती दिली की, ओरसांग नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ झाल्यानंतर वलसाडमधील काही सखल भागात पूर आला आहे. कावेरी आणि अंबिका नद्या धोक्याच्या चिन्हावरून वाहत आहेत, त्यामुळे नवसारी जिल्ह्याचे अधिकारीही सतर्क आहेत. वलसाड आणि नवसारी जिल्ह्यात शनिवारी रात्री आणि रविवारी सकाळी जोरदार पाऊस झाला, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. ते म्हणाले की, छोटा उदयपूर आणि नर्मदा जिल्ह्यातही मुसळधार पाऊस झाला असून त्यामुळे नद्यांना पूर आला आहे आणि सखल भागात पूर आला आहे.

400 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात यश

वलसाडमधील ओरसांग नदीच्या पाण्याची पातळी वाढल्याने आणि सखल भागात पूर आल्याने 400 हून अधिक लोकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. त्यांनी सांगितले की, रविवारी वलसाडमध्ये थोडासा दिलासा मिळाला आणि पाण्याची पातळी कमी झाली, त्यानंतर लोक आपापल्या घरी परतायला लागले.

शनिवारपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे दक्षिण आणि मध्य गुजरात आणि सौराष्ट्र भागातील अनेक धरणे तुडुंब भरली असून नद्यांना पूर आला आहे. अनेक नद्या धोक्याच्या चिन्हाजवळून वाहत असून, संबंधित प्रशासनाला सतर्क राहण्यास सांगितले आहे. त्यामूळे काल पर्यंत आसाम राज्यातील भीषण पुरस्थिती गुजरातची होण्यापूर्वी पावसाने काहीशी उसंत घेणे गरजेच आहे. तसेच प्रशासनाने ही सतर्क राहणे अत्यावश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Lokayukta Goa: गोव्याला मिळणार नवे लोकायुक्त! न्यायमूर्ती संदीप शिंदे यांच्या नावावर शिक्कामोर्तब

स्पोर्ट्स बाईक प्रेमींसाठी खास! दमदार लूक आणि पॉवरफुल इंजिनसह 'KTM RC 160' लाँच, Yamaha R15 ला देणार टक्कर, किंमत फक्त...

WPL 2026 चा श्रीगणेशा! पहिल्याच सामन्यात स्मृती-हरमन आमने-सामने; कुठे अन् कधी पाहता येणार मुंबई विरूध्द बंगळुरू सामना? जाणून घ्या सर्व

गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यांवर 'Drishti'च्या जीवरक्षकांचे 'रेस्क्यू ऑपरेशन'; 22 पर्यटकांचे वाचवले प्राण

Goa Crime: खाकी वर्दीचा धाक दाखवून वृद्धांना लुटायचे, डिचोलीत तोतया पोलिसांच्या टोळीचा पर्दाफाश! दोघे अटकेत

SCROLL FOR NEXT