जम्मू काश्मीर: दहशतवाद्यांनी 700 स्थानिक तरुणांची केली भरती

केंद्रशासित प्रदेशात 141 दहशतवादी सक्रिय
Jammu Kashmir LIve News Update
Jammu Kashmir LIve News UpdateDainik Gomantak

भारतात पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी संघटना जम्मू- काश्मिरच्या निम्मित्ताने भारतावर वारंवार हल्ला करण्याचा प्रयत्नात असतात. यासाठी दहशतवादी संघटनांच्या माध्यमातून अनेकवेळा भारतावर हल्ले करण्याचा छुपा प्रयत्न केला जात आहे. या पार्श्वभूमीवर जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी स्थानिक तरुणांची भरती केली असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. (jammu kashmir terrorist recruited 700 youth in four years )

Jammu Kashmir LIve News Update
अमरनाथ दुर्घटना: महाराष्ट्रातील महिलेचा मृतदेह पोहोचला दिल्लीत, कुटुंबात खळबळ

मिळालेल्या माहितीनुसार जम्मू-काश्मीरमधील दहशतवादी संघटनांनी गेल्या चार वर्षांत 700 स्थानिक तरुणांची भरती केली आहे, यातील केंद्रशासित प्रदेशात 141 दहशतवादी सक्रिय असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्यापैकी बहुतेक परदेशी आहेत. अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, जम्मू-काश्मीरमध्ये मोठ्या प्रमाणात दहशतवाद्यांची घुसखोरी ही सीमेपलीकडे असलेल्या दहशतवादी तळांमधून सुरू असल्याचे म्हटले आहे. (Jammu Kashmir LIve News Update)

Jammu Kashmir LIve News Update
संकटकाळात भारताचा श्रीलंकेला मदतीचा हात; अमेरिकाही आली धावून

गेल्या चार वर्षात जम्मू आणि काश्मीरमध्ये 700 स्थानिक तरुणांची भरती

या चार वर्षांत जम्मू आणि काश्मीरमध्ये 700 स्थानिक तरुणांची भरती केली आहे, त्यापैकी 2018 मध्ये 187, 2019 मध्ये 121, 2020 मध्ये 181 आणि 2021 मध्ये 142 जणांची भरती करण्यात आली होती. केंद्रीय गृह मंत्रालयाने स्पष्ट केलेल्या आकडेवारीनुसार, 5 जुलै 2022 पर्यंत जम्मू-काश्मीरमध्ये एकूण 82 विदेशी दहशतवादी आणि 59 स्थानिक दहशतवादी सक्रिय होते.

या संदर्भात एका अधिकाऱ्याने सांगितले की, हे दहशतवादी प्रामुख्याने जैश-ए-मोहम्मद आणि हिजबुल मुजाहिद्दीन याशिवाय लष्कर-ए-तैयबा, त्याची संलग्न संघटना द रेझिस्टन्स फ्रंट यासारख्या संघटनांतील आहेत. (Jammu Kashmir terrorist News)

सुरक्षा दलांनी 55 चकमकीत 125 दहशतवाद्यांना धाडले यम सदनी

त्याचवेळी, सुरक्षा दलांनी या वर्षात आतापर्यंत 55 चकमकीत 125 दहशतवाद्यांना ठार केले आहे. यावर्षी दहशतवादी घटनांमध्ये आतापर्यंत दोन सुरक्षा जवानांना आपला जीव गमवावा लागला आहे तर 23 जण जखमी झाले आहेत.

या वर्षी जम्मू-काश्मीरमध्ये 20 नागरिकांचाही बळी गेला आहे. यासोबतच या वर्षात केंद्रशासित प्रदेशात आठ ग्रेनेड हल्ले झाले आहेत. आकडेवारीनुसार, 2021 मध्ये जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या दहशतवादी घटनांमध्ये 146 दहशतवादी आणि 41 नागरिकांचा मृत्यू झाला आणि तीन सुरक्षा कर्मचाऱ्यांनाही आपला जीव गमवावा लागला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com