Covid-19: देशात मास्क पासुन मुक्ती मिळल्या नंतर आता देशात पुन्हा कोरोना ने हाहाकार माजवला आहे. सक्रिय कोरोना रुग्णांच्या संख्येत दिवसोंनदिवस वाढू लागल्याने पुन्हा एकदा लोकांची चिंता वाढू लागली आहे. आरोग्य मंत्रालयाने रविवारी (24 जुलै) ला जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 1,52,200 झाली आहे.
जी शुक्रवारच्या तुलनेत 2100 अधिक रूग्ण वाढले आहेत. गेल्या 24 तासात कोरोनाचे 20,279 नवीन रुग्ण आढळले आहेत. आणि 18,143 रूग्ण कोरोणा मक्त झाले आहेत. तर 36 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण 5,26,033 लोकांचा मृत्यू झाला आहे.
दिल्लीत कोरोनाची रूग्ण दिल्लीत वाढू लागले
दिल्लीत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 738 नवे रुग्ण आढळले असून एका रुग्णाचा मृत्यू झाला आहे. कोरोनाचा संसर्ग दर 5.04 टक्क्यांवर गेला आहे. दिल्लीमध्ये महामारीच्या सुरुवातीपासून, संसर्गाची 19,47,763 प्रकरणे नोंदवली गेली आहेत आणि 26,299 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या शहरात कोविडचे 2489 रुग्ण उपचार घेत आहेत.
मुंबईत कोरोनाचे 266 नवीन रुग्ण
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत गेल्या 24 तासांत कोरोनाचे 266 रुग्ण आढळले असून एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. शहरात संक्रमित आढळलेल्या लोकांची संख्या आता 11.22 लाख झाली आहे, तर आतापर्यंत 16 हजार 638 लोकांचा मृत्यू झाला आहे.
महाराष्ट्रात गेल्या 24 तासांत कोरोनाचे 2,336 नवे रुग्ण आढळले असून पाच जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात साथीच्या आजाराची सुरुवात झाल्यापासून मृतांची संख्या 1,48,056 वर पोहोचली आहे. राज्यात बरे झालेल्यांची एकूण संख्या 78,69,591झाली आहे.
गेल्या पाच दिवसातील कोरोनाची आकडेवारी
24 जुलै - 20,279
23 जुलै - 21,411
22 जुलै - 21,880
21 जुलै - 21,566
20 जुलै - 20557
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.