CDS General Bipin Rawat Dainik Gomantaks
देश

"त्याने पाणी मागितले होते" अपघातानंतर जनरल बिपिन रावतांना पाहिलं; प्रत्यक्षदर्शींचा दावा

शिव कुमार (Shiv Kumar) यांचा दावा आहे की, मी हवाई दलाचे हेलिकॉप्टर पडताना आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहिले. त्यानंतर मी तात्काळ सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचलो.

दैनिक गोमन्तक

तामिळनाडूच्या (Tamil Nadu) निलगिरी हिल्समध्ये बुधवारी हेलिकॉप्टर अपघात झाला, ज्यामध्ये सीडीएस जनरल बिपिन रावत (CDS General Bipin Rawat) आणि त्यांच्या पत्नीसह 13 जणांना प्राण गमवावे लागले. प्रत्यक्षदर्शींनी माध्यमाशी संवाद साधताना दुर्घटनेविषयी सांगितले. दरम्यान, शिव कुमार (Shiv Kumar) हा ठेकेदार आपल्या भावाला भेटण्यासाठी जात असताना बुधवारी दुपारी निलगिरीतील कुन्नूरजवळ हेलिकॉप्टर कोसळले. तो चहाच्या बागेत काम करतो. शिव कुमार यांचा दावा आहे की, मी हवाई दलाचे हेलिकॉप्टर पडताना आणि आगीच्या भक्ष्यस्थानी पडताना पाहिले. त्यानंतर मी तात्काळ सहकाऱ्यांसोबत घटनास्थळी पोहोचलो.

दरम्यान, शिवकुमारने माध्यमाशी बोलताना सांगितले की, आम्ही तीन जणांना पडताना पाहिले. त्यापैकी एक जिवंत होता. त्याने पाणी मागितले. ज्यावेळी तीन तासांनंतर कोणीतरी शिवकुमारला चीफ ऑफ डिफेन्स स्टाफचा यांचा फोटो दाखवला तेव्हा त्याने सांगितले की, मी ज्या व्यक्तीशी बोलत होतो ते जनरल बिपिन रावत होते.

त्यानंतर, शिवकुमार अश्रू ढाळत म्हणाले की, या माणसाने देशासाठी इतकं केलं आणि त्यांना पाणीही देऊ शकत नाही, यावर माझा विश्वास बसत नाही. मी रात्रभर झोपू शकलो नाही." जनरल बिपिन रावत यांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाल्याची माहिती मिळाली. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी संसदेत सांगितले की, अपघाताच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत.

शिवाय, CDS जनरल बिपिन रावत आणि त्यांच्या पत्नीचे पार्थिव आज दिल्लीत आणले जाणार आहे. शुक्रवारी त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत. संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी आज संसदेच्या दोन्ही सभागृहात जनरल बिपिन रावत आणि इतर सैनिकांच्या मृत्यूवर वक्तव्य केले. या घटनेच्या उच्चस्तरीय चौकशीचे आदेश देण्यात आल्याचे संरक्षणमंत्र्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, सर्वांवर पूर्ण लष्करी सन्मानाने अंत्यसंस्कार केले जातील. त्यानंतर दोन्ही सभागृहात मौन पाळून शहीद जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT