Bank Robbery Dainik Gomantak
देश

Bank Robbery: 10 मिनिटात 7 कोटींचं सोनं आणि 5 लाखांची रोकड केली लंपास! झारखंडमध्ये बँकेवर दरोडेखोरांचा छापा; कर्मचारी-ग्राहकांना ठेवलं ओलीस

7 Crore Gold Robbed Jharkhand: झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातून गुन्हेगारीची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली.

Manish Jadhav

Hazaribagh Bank Robbery: झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातून गुन्हेगारीची एक अत्यंत धक्कादायक आणि खळबळजनक घटना समोर आली. बरही येथील 'बँक ऑफ महाराष्ट्र'च्या शाखेवर भरदिवसा सशस्त्र दरोडेखोरांनी हल्ला चढवून सुमारे 6 ते 7 कोटी रुपयांचे सोने आणि लाखो रुपयांची रोकड लुटून नेली. वर्दळीच्या रस्त्यावर असलेल्या बँकेत अवघ्या 10 ते 15 मिनिटांत ही मोठी लूट झाल्याने पोलीस प्रशासनाच्या सुरक्षा व्यवस्थेवर मोठे प्रश्नचिन्ह उभे राहिले. या घटनेनंतर संपूर्ण परिसरात दहशतीचे वातावरण पसरले असून पोलिसांनी नाकेबंदी करुन तपास वेगाने सुरु केला.

मिळालेल्या माहितीनुसार, बरही परिसरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या बँक ऑफ महाराष्ट्रच्या शाखेत नेहमीप्रमाणे कामकाज सुरु होते. बँकेत ग्राहकही उपस्थित होते. दुपारी अचानक चार ते पाच सशस्त्र दरोडेखोर हातात शस्त्रे घेऊन बँकेत घुसले. त्यांनी क्षणात तिथे उपस्थित असलेले कर्मचारी आणि ग्राहकांना ओलीस धरले. शस्त्राचा धाक दाखवून दरोडेखोरांनी बँकेच्या कर्मचाऱ्यांना लॉकर उघडण्यास भाग पाडले. अत्यंत नियोजित पद्धतीने त्यांनी लॉकरमधील सुमारे 6 ते 7 कोटी रुपये किमतीचे सोने आपल्या ताब्यात घेतले. याव्यतिरिक्त, काउंटरवर असलेली 4 ते 5 लाख रुपयांची रोख रक्कमही त्यांनी लंपास केली.

प्रत्यक्षदर्शींनी दिलेल्या माहितीनुसार, हे दरोडेखोर पूर्ण तयारीनिशी आले होते. त्यांनी बँकेत शिरल्यापासून लूट करुन पसार होईपर्यंतची सर्व प्रक्रिया अवघ्या 15 मिनिटांत पूर्ण केली. यावरुन त्यांनी आधीच या गुन्ह्याचा सखोल कट रचल्याचे स्पष्ट होत आहे. बँक लुटल्यानंतर दरोडेखोर वेगाने तिथून पसार झाले. या घटनेची माहिती मिळताच पोलीस पथक घटनास्थळी दाखल झाले. बँकेतील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी केली जात असून दरोडेखोरांच्या मार्गाचा माग काढला जात आहे. बँक (Bank) अधिकाऱ्यांकडून झालेल्या नुकसानीचा नेमका आकडा स्पष्ट केला जात असला तरी, प्राथमिक अंदाजानुसार ही या भागातील आतापर्यंतची सर्वात मोठी बँक लूट मानली जात आहे. या घटनेने हजारीबागसह संपूर्ण झारखंडमध्ये खळबळ उडाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT