House Dainik Gomantak
देश

Khargone Violence: '...म्हणून माझं घरं पाडलं'

हसीना (Hasina Fakhru) यांचा आरोप आहे की, 'प्रशासनाने मला घर रिकामे करण्यासाठी अनेकदा नोटिसा दिल्या होत्या.

दैनिक गोमन्तक

मध्य प्रदेश: मध्य प्रदेशातील खरगोन शहरात रामनवमी मिरवणुकीत दगडफेक आणि जाळपोळ केल्याप्रकरणी जिल्हा प्रशासनाने मंगळवारपर्यंत आरोपींच्या 52 मालमत्ता जमीनदोस्त केल्या आहेत. याप्रकरणी 80 हून अधिक जणांना अटक करण्यात आली आहे. मध्य प्रदेश (Madhya Pradesh) सरकारच्या आदेशानुसार आरोपींच्या कायदेशीर मालमत्तेची नासधूस करण्याचे काम सुरु असून जे नुकसान झाले आहे, त्याची भरपाई या लोकांकडून केली जाईल, असही सांगण्यात येत आहे. पाडण्यात आलेल्या मालमत्तांमध्ये पंतप्रधान आवास योजनेंतर्गत बांधलेल्या घराचांही समावेश आहे. ज्यामधील एक घर हसीना फखरु (Hasina Fakhru) यांच्या नावावर आहे. हसीना यांचा आरोप आहे की, 'प्रशासनाने मला घर (House) रिकामे करण्यासाठी अनेकदा नोटिसा दिल्या होत्या. परंतु आता माझे घर पाडण्यात आले असल्याने मला राहण्यासाठी जागा नाही.' (Hasina Fakhru's house built under the Prime Minister's Housing Scheme has been demolished by the administration)

दरम्यान, घर तुटल्याची वेदना हसीना यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसत होती. त्यांचे अश्रू थांबत नव्हते. हे घर प्रधानमंत्री निवास योजनेअंतर्गत बांधण्यात आले होते, ते आता पाडण्यात आले. 2019-20 मध्ये हे घर हसीना यांच्या कुटुंबीयांना मिळालं होतं. बांधकामासाठी त्यांचे सुमारे 2.5 लाख रुपये खर्च झाले होते. सर्व कागदपत्रे हसीना यांचा मुलगा अमजद याच्याकडे आहेत, जो रोजंदारीवर काम करतो.

तसेच, या योजनेंतर्गत मिळालेल्या घराचा फोटो घेऊन हसीना यांनी माध्यमाशी बोलताना म्हणाल्या, ''आम्हाला एक लाख पन्नास हजारांचा हप्ता मिळाला होता. घराच्या बांधकामासाठी आम्ही काही रक्कम उधारही घेतली होती. घर बांधल्यावर चांगलं होईल असं वाटलं होतं, परंतु प्रशासनाने घर पाडलं. आता आम्हाला या अवस्थेत सोडले असून आता आम्ही कुठं जायचं."

पुढे बोलताना हसीना म्हणाल्या, 'आम्हाला घर रिकामे करण्याच्या नोटिसा आल्या होत्या, केस सुरु असल्याने आम्ही अनेकवेळा तहसीलमध्ये गेलो होतो, त्यानंतर आम्ही जाणं बंद केलं.' घटनास्थळी उपस्थित असलेला आणखी एक व्यक्ती म्हणाला, ''सीएम शिवराज चौहान इथे आले होते. तु सध्या जिथे राहतोय, तिथेच राहशील, असे आश्वासनही त्यांनी दिले होते. मी नळ कनेक्शन देईन, लाईट पण देईन, 'मामा' अजून जिवंत आहे, असंही त्यांनी म्हटलं होतं. पण हे मामा आता काय काम करत आहेत. एकीकडे देत आहेत, तर दुसरीकडे नष्ट करत चालले आहेत.''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shehbaz Sharif: भारताला शत्रू म्हटले, युद्ध जिंकल्याचा केला दावा, शेवटी शांततेसाठी मागितली भीख; पाकच्या पंतप्रधानांचा युएनमध्ये थापांचा पाऊस

रावळपिंडी एक्सप्रेसचं स्लिप ऑफ टंग! अख्तरच्या तोंडून अभिषेक शर्माऐवजी अभिषेक बच्चनचं नाव, त्याने पोस्ट करत दिली प्रतिक्रिया Watch Video

Shehbaz Sharif Video: 'पाकिस्तान दहशतवाद कधी थांबवणार?' रिपोर्टरच्या थेट प्रश्नावर काय म्हणाले शाहबाज शरीफ? शाब्दिक चकमकीचा व्हिडिओ व्हायरल

43.20 कोटींच्या कोकेन प्रकरणात आरोपीला सशर्त जामीन मंजूर; दक्षिण गोवा जिल्हा सत्र न्यायालयाचा मंगेश वाडेकरला दिलासा

Goa Crime: 17 वर्षीय मुलीला पळवून नेऊन केला लैंगिक अत्याचार, डिचोलीतील घटनेनं खळबळ; कणकवलीच्या तरुणाला अटक

SCROLL FOR NEXT