Farmers Protest Dainik Gomantak
देश

Farmers Protest: शंभू बॉर्डरवर अशांतता निर्माण करणाऱ्यांवर पोलिसांची मोठी कारवाई, पासपोर्ट-व्हिसा होणार रद्द!

Farmers Protest: अंबाला येथील शंभू बॉर्डरवर अशांतता निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी हरियाणा पोलिसांनी केली आहे.

Manish Jadhav

Farmers Protest: अंबाला येथील शंभू बॉर्डरवर अशांतता निर्माण करणाऱ्या शेतकऱ्यांवर कारवाई करण्याची तयारी हरियाणा पोलिसांनी केली आहे. कठोर कारवाई करत पोलिसांनी अशा अनेक शेतकऱ्यांचे फोटो मीडियासोबत शेअर केले आहेत, जे बॉर्डरवर उपद्रव करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे, पोलिसांनी असे अनेक व्हिडिओ शेअर केले आहेत. या शेतकऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी अशा लोकांचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. हरियाणा पोलीस उपअधीक्षक जोगिंदर सिंग यांनी सांगितले की, आत्तापर्यंत आम्ही 25 लोकांच्या छायाचित्रांच्या आधारे त्यांची डिटेल्स गोळा करण्यास सुरुवात केली आहे, एकूण संख्या 100 च्या आसपास असू शकते.

'सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे योग्य नाही'

सिंग यांनी पुढे सांगितले की, या सर्वांनी आपल्यासोबत काठ्या, दगड, गोफण आणले होते. त्यांनी जाणीवपूर्वक अशांतता निर्माण केली. तत्पूर्वी, आम्ही आमच्या ड्रोन कॅमेरा आणि इतर कॅमेऱ्यांच्या मदतीने त्यांची ओळख पटवण्यास सुरुवात केली आहे. सरकारी मालमत्तेचे नुकसान करणे अजिबात योग्य नाही. या शेतकऱ्यांवर कारवाई करत पोलिसांनी अशा लोकांचे पासपोर्ट आणि व्हिसा रद्द करण्यात येणार असल्याचे सांगितले आहे. त्यांनी पुढे सांगितले की, फोटो आणि व्हिडिओ एकत्रित शेअर केले जात आहेत आणि लवकरच ही यादी तयार करुन दूतावास आणि पासपोर्ट कार्यालयाकडे पाठवली जाईल.

शेतकऱ्याने बॅगमध्ये दगड आणले होते, तोंड झाकले होते

याआधी हरियाणा पोलिसांनी अंबालाच्या शंभू बॉर्डरवर शेतकऱ्यांनी अशांतता निर्माण केल्याचे फोटो आणि व्हिडिओ जारी केले होते, ज्यामध्ये काही शेतकरी पोलिसांवर दगडफेक करताना दिसत होते. बॉर्डर ओलांडणाऱ्या शेतकऱ्यांना रोखण्यासाठी पोलीस अश्रुधुराच्या नळकांड्या फोडत असताना काही आंदोलकांनी त्यांच्यावर दगडफेक केली. हे व्हिडिओ आणि फोटो प्रसिद्ध करुन पोलिसांनी सर्वसामान्यांना या बदमाशांना ओळखण्यासाठी मदत करण्याचे आवाहन केले होते.

अनेक शेतकरी आणि पोलीस जखमी

आपल्या मागण्यांसाठी दिल्ली मार्चची हाक देणारे शेतकरी हरियाणा-पंजाब बॉर्डरवर आहेत. हरियाणा सरकारने पंजाबच्या सीमेवर बॅरिकेड्सचे अनेक थर उभे करुन शेतकऱ्यांचा मार्ग रोखला होता, तेव्हापासून शेतकरी शंभू आणि खानौनी बॉर्डरवर तळ ठोकून आहेत. यावेळी शेतकऱ्यांनी बॅरिकेड्स तोडण्याचा प्रयत्न केला आणि पोलिसांशी झटापट झाली, ज्यात अनेक शेतकरी आणि पोलिस जखमी झाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT