Gurugram Fire Twitter
देश

Gurugram Fire: मानेसरमध्ये भीषण आग लागून अनेक झोपड्या जळून खाक

हरियाणातील गुरुग्राम जिल्ह्यातील मानेसरमध्ये काल रात्रीपासून लागलेली भीषण आग अद्याप आटोक्यात आलेली नाही.

दैनिक गोमन्तक

हरियाणातील (Haryana) गुरुग्राम जिल्ह्यातील मानेसरमध्ये काल रात्रीपासून लागलेली भीषण आग अद्याप आटोक्यात आली नाही. सेक्टर-6 जवळील कचऱ्याच्या ढिगाऱ्याला सोमवारी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास भीषण आग लागली. जी वादळामुळे अनेक किलोमीटरच्या परिसरात पसरले. दुसरीकडे घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी दाखल झालेल्या अग्निशमन विभागाच्या 35 हून अधिक गाड्याही आगीला आटोक्यात आणण्यात अपयशी ठरले आहे. (Gurugram Fire News)

मिळालेल्या माहितीनुसार, गुरुग्रामच्या मानेसर सेक्टर 6 मध्ये लागलेल्या भीषण आगीमध्ये सुमारे 50 एकरमध्ये बांधलेली झोपडपट्या जळून खाक झाल्या आहेत. सुमारे पाच किलोमीटरच्या परिसरात पसरलेली आग आटोक्यात आणण्याचे प्रयत्न सुरू आहेत. आगीत होरपळून आतापर्यंत एका महिलेचा मृत्यू झाला असून 6 लोक जखमी झाल्याची माहिती आहे.

असे सांगितले जात आहे की मानेसर सेक्टर-6 मधील ककरौला गावात काही झोपडयांमध्ये रात्रीचे जेवण तयार केले जात होते, तेव्हा जोरदार वादळ आले, त्यामुळे ठिणगी कचऱ्याच्या ढिगाऱ्यापर्यंत पोहोचली आणि बघता बघता भीषण आग लागली. आग इतकी वेगाने पसरली की लोकांना घरातील सामान बाहेर काढण्याची संधी मिळाली नाही. झोपडपट्टीत ठेवलेले गॅस सिलिंडरही (Cylinder) आगीच्या झपाट्यात आले आणि रात्री स्फोट होत राहिले. या आगीमुळे अनेक गरीब कुटुंबे बेघर झाली आहेत.पोलीस आणि प्रशासनाचे अधिकारी घटनास्थळी हजर आहेत. अग्निशमन दलाच्या गाड्यांसोबतच अग्निशमन दलाचे 250 हून अधिक गाड्या रात्रीपासून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न करत आहेत. सध्या परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतरच आगीमुळे झालेल्या नुकसानीचा अंदाज येईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT