Hardoi Railway Track Incident Dainik Gomantak
देश

Viral Video: दारूच्या नशेत जीव धोक्यात! रेल्वे रुळावर पडला तरुण; वेगात ट्रेन आली अन्... थरारक व्हिडिओ होतोय व्हायरल

Hardoi Railway Track Incident: उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्यातील सीतापूर-बालामऊ रेल्वेमार्गावर घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

Sameer Amunekar

उत्तर प्रदेशातील हरदोई जिल्यातील सीतापूर-बालामऊ रेल्वेमार्गावर घडलेल्या एका थरारक घटनेने सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे. मद्यधुंद अवस्थेतील एक तरुण अचानक रेल्वे रुळावर जाऊन पडल्याने धावत्या रेल्वेला आपत्कालीन ब्रेक लावावे लागले. सुदैवाने लोको पायलटने योग्य वेळी प्रसंगावधान दाखवल्यामुळे मोठी दुर्घटना टळली आणि संबंधित तरुणाचा जीव वाचला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात शेअर केला जात आहे.

अचानक रुळावर पडला तरुण

मिळालेल्या माहितीनुसार, अटवा मुठिया आणि कमालपूर रेल्वे स्थानकांदरम्यान ही घटना घडली. संबंधित तरुण दारूच्या नशेत असल्यामुळे त्याचा स्वतःवरील ताबा सुटला होता. तो रेल्वे रुळाजवळ भटकत असताना अचानक घसरून थेट धावत्या ट्रेनसमोर रुळांवर पडला. काही क्षणांत मोठा अनर्थ घडण्याची शक्यता निर्माण झाली होती.

लोको पायलटच्या निर्णयामुळे वाचला जीव

ट्रेन वेगात असतानाच लोको पायलटच्या नजरेस ही घटना आली. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्याने क्षणाचाही विलंब न लावता आपत्कालीन ब्रेक लावले. त्यामुळे ट्रेन वेळेत थांबली आणि संभाव्य अपघात टळला. रेल्वे प्रशासनाच्या मते, अशा परिस्थितीत काही सेकंदांचा विलंबही जीवघेणा ठरू शकतो.

ट्रेन थांबताच रेल्वे कर्मचारी आणि परिसरातील नागरिक तातडीने घटनास्थळी पोहोचले. त्यांनी एकत्रित प्रयत्न करून रुळाखाली अडकलेल्या तरुणाला सुरक्षित बाहेर काढले. त्यानंतर त्याची प्रकृती तपासण्यात आली. वेळेत मदत मिळाल्यामुळे त्याचा जीव वाचल्याचे सांगितले जात आहे.

सोशल मीडियावर चालकाचे कौतुक

या घटनेचा व्हिडिओ इंटरनेटवर व्हायरल झाल्यानंतर अनेकांनी लोको पायलटच्या सतर्कतेचे आणि धाडसाचे कौतुक केले आहे. अनेक सोशल मीडिया वापरकर्त्यांनी, "कर्तव्यदक्ष चालकामुळे एका कुटुंबाचा आधार वाचला," अशा प्रतिक्रिया व्यक्त केल्या. काहींनी विनोदी शैलीत, "इतकी नशा करू नका की ट्रेनलाच तुमच्यासाठी थांबावं लागेल," अशी टिप्पणीही केली.

नागरिकांसाठी इशारा

ही घटना केवळ व्हायरल व्हिडिओपुरती मर्यादित नसून रेल्वे सुरक्षेबाबतचा महत्त्वाचा संदेशही देते. मद्यधुंद अवस्थेत किंवा निष्काळजीपणे रेल्वे रुळांवर वावरणे अत्यंत धोकादायक ठरू शकते. या वेळी लोको पायलटच्या प्रसंगावधानामुळे आणि स्थानिकांच्या मदतीमुळे एका तरुणाचा जीव वाचला. मात्र, प्रत्येक वेळी असेच घडेल याची खात्री नसते. त्यामुळे रेल्वे परिसरात नियमांचे पालन करणे आणि सुरक्षिततेला प्राधान्य देणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी असल्याचे या घटनेतून पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Student Protest Over Paper Leak: 36 दिवसांचा लढा यशस्वी! 'कॉक्रोच जनता पार्टी'च्या आंदोलनासमोर मोदी सरकारला अखेर नमते घ्यावेच लागले

Goa E Tender Process: राज्यातील काही ग्रामपंचायतींकडून ई-निविदा नियम धाब्यावर; पाच लाखांवरील टेंडर पद्धतीत गैरव्यवहार

CWG 2026 मध्ये थरारक अपघात! हाय बारवरून थेट डोक्यावर कोसळला इंग्लंडचा खेळाडू; तातडीने रुग्णालयात दाखल VIDEO

Dharmendra Pradhan Resignation: लढा अजूनही कायम! दिल्लीतील आंदोलनाच्या यशानंतर कार्यकर्त्यांचा पणजीत आनंदोत्सव

Goa Road Accidents: गोव्यात दरमहा 23 जणांचा होतोय अपघाती मृत्यू ; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची लोकसभेत माहिती, दररोज 8 रस्ते अपघातांची नोंद

SCROLL FOR NEXT