Hardik Patel Dainik Gomantak
देश

"भाजपमध्ये काही चांगल्या गोष्टी...", हार्दिक पटेलच्या नव्या वक्तव्यानं काँग्रेस अडचणीत

काँग्रेस नेते हार्दिक पटेल (Hardik Patel) यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्व आणि गुजरात काँग्रेस युनिटवर हल्लाबोल केला आहे.

दैनिक गोमन्तक

काँग्रेस नेते हार्दिक पटेल यांनी पुन्हा एकदा पक्ष नेतृत्व आणि गुजरात काँग्रेस युनिटवर हल्लाबोल केला आहे. हार्दिक पटेल यांच्या या नव्या संकेतांमुळे काँग्रेसच्या अडचणी वाढल्या आहेत. पक्ष नेतृत्व आपल्याला बाजूला सारत असल्याचा आरोप पटेल यांनी केला आहे. गेल्या तीन वर्षांपासून ते सातत्याने पक्षाकडे तक्रारी करत आहेत. (Hardik Patel has said that there are some good things in BJP that we should accept)

दरम्यान, गुजरात (Gujarat) निवडणूक 2022 च्या आधी भाजपचे (BJP) कौतुक करत हार्दिक यांनी पक्षाच्या अडचणी वाढवल्या आहेत. दुसरीकडे मात्र, हार्दिक यांनी आपण भाजपच्या संपर्कात असल्याचे नाकारले आहे. तथापि, भाजपमध्ये काही चांगल्या गोष्टी आहेत, ज्या आपण स्वीकारल्या पाहिजेत असेही त्यांनी म्हटले आहे. मात्र, भाजप सरकारच्या काळात हार्दिक पटेल यांनी पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले होते.

तसेच, हार्दिक पटेल यांनी माध्यमाशी साधलेल्या संवादात म्हटले की, "भाजपने अलीकडे काही राजकीय निर्णय घेतले आहेत, त्यांना अशी पावले उचलण्याची सवय आहे. त्यांची बाजू न घेता किंवा त्यांची प्रशंसा न करता, आम्ही किमान हे सत्य स्वीकारु." गुजरातमध्ये कॉंग्रेसला (Congress) मजबूत बनायचं असले तर काही कठोर निर्णय घ्यावे लागतील असंही हार्दिक यांनी यावेळी म्हटले.

दुसरीकडे, आपण काँग्रेस सोडण्याच्या मार्गावर असल्याचे हार्दिक यांनी नाकारले. काही दिवसांपूर्वी पटेल यांनी वराची नसबंदी केल्यासारखे वाटत असल्याचे विधान केले होते. 2015 मध्ये हार्दिक पटेल यांनी गुजरातमध्ये पाटीदार समाजाच्या आरक्षणासाठी मोठे आंदोलन उभे केले होते. 2019 च्या आधी त्यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला होता. मात्र, राजकीय डावाच्या सुरुवातीपासून त्यांची लोकप्रियता घसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

World Cup 2025: टीम इंडियासाठी 'करो या मरो'चा सामना, उपांत्य फेरी गाठण्यासाठी 'विजय' आवश्यक; इंग्लंडविरुद्ध 'अशी' असेल Playing 11

Goa Diwali Bazar: पणजी, दिवचल भरला दिवाळी बाजार...

Pakistan-Afghanistan War: "पाकिस्तान क्रिकेट को बर्बाद करना चाहता है…" माजी अफगाण कर्णधाराची शत्रू देशावर टीका

राजधानीत नरकासुराचा 'हाहाकार', दिवाळीची तयारी जोरदार ; Watch Video

जब तक सूरज - चांद रहेगा तब तक पर्रीकर- रवि तुम्हारा नाम रहेगा! मागोवा

SCROLL FOR NEXT