काँग्रेसचा अध्यक्ष बिगर गांधी घराण्याचा? प्रशांत किशोर यांच्या रणनितीची चर्चा

पंजाबच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसनेही किशोर यांच्या रणनितीवर चालण्याचे ठरवले
Prashant kishor sonia gandhi
Prashant kishor sonia gandhiDainik Gomantak

नवी दिल्ली : काही दिवसांपासून काँग्रेसची (Congress) पुनर्बांधणी आणि पुनरुज्जीवन करण्यासाठी निवडणूक रणनितीकार प्रशांत किशोर मैदानात उतरले असल्याचे दिसत आहे. फेब्रुवारी-मार्चमध्ये पार पडलेल्या 5 राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत (Assembly Election), विशेषत: पंजाबच्या निवडणुकीत झालेल्या दारुण पराभवानंतर काँग्रेसनेही किशोर यांच्या रणनितीवर चालण्याचे ठरवले असल्याचे दिसत आहे. त्यामुळेच किशोर हे आता थेट काँग्रेस पक्षात प्रवेश करणार आहेत.

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांच्याशी 4 ते 5 भेटीनंतर किशोर यांनी हा निर्णय घेतला आहे. प्रशांत किशोर यांनी सोनिया गांधीसोबतच्या बैठकांमध्ये संपूर्ण आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. या सादरीकरणात एक महत्त्वाचा मुद्दा सांगितला जात आहे तो म्हणजे पक्षाचे नेतृत्व एखाद्या प्रभावशाली आणि दमदार पण 'बिगर-गांधी' नेत्याकडे असेल. तरच पक्षाचे पुनरुज्जीवन लवकर शक्य आहे. मात्र, खुद्द पत्रकारांनी प्रशांत किशोर यांना याबाबत प्रश्न विचारला असता त्यांनी थेट 'हो' किंवा 'नाही' असे उत्तर दिले नाही.

Prashant kishor sonia gandhi
PK लावणार काँग्रेसची नौका पार? चार दिवसांत सोनिया गांधींसोबत तिसरी भेट

गांधी, बिगर-गांधीचे नेतृत्व चर्चेचा मुद्दा

दीड वर्षापूर्वी पश्चिम बंगालच्या (West Bengal) निवडणुकीनंतर लगेचच प्रशांत किशोर (Prashant Kishor) यांनी काँग्रेस नेतृत्वाला याबाबतचा प्रस्ताव दिला होता. पण नंतरच्या काळात काही हालचाल झाली नाही. यावेळी मात्र काँग्रेसने त्यांच्या प्रस्तावावर पुढे जाण्याचे ठरवले असले तरी, या दोन प्रस्तावांमध्ये समाविष्ट असलेला 'गांधी आणि बिगर-गांधी' हा मुद्दा चर्चेचा राहिला आहे. काही माध्यम वृत्तांनुसार प्रशांत किशोर यांनी पक्षाचे नेतृत्व बिगर गांधी नेत्याकडे सोपवण्याचा सल्ला दिला आहे. इतर अहवालानुसार प्रशांत यांच्या सादरीकरणातून काँग्रेस नेतृत्वाची तीन पातळ्यांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. सोनिया गांधी पहिल्या स्तरावर अध्यक्षाच्या भूमिकेत आहेत. दुसऱ्या स्तरावर राहुल गांधी हे पक्षाच्या संसदीय पक्षाचे प्रमुख आहेत. तर तिसऱ्या स्तरावर कोणताही बिगर-गांधी अध्यक्ष कार्यकारी अध्यक्षाप्रमाणे एक व्यक्ती उभा करण्याची योजना आहे.

बिगर-गांधी मुद्द्यावर एवढी चर्चा का?

विरोधी पक्षांपेक्षा गांधी घराण्यातील सदस्याच्या हातात काँग्रेसची कमान असण्याचा मुद्दा या पक्षात जास्त महत्त्वाचा आहे. मागील काही वर्षांत असे प्रसंग अनेकदा आले की काँग्रेसची कमान बिगर गांधी नेत्याकडे सोपवण्यात आली आणि पक्षाचे तुकडे झाले. बडे नेते वेगळे झाले. जेव्हा गांधी घराणे नेतृत्वापदी राहिले तेव्हा पक्ष तुलनेने अधिक एकसंध राहिला. त्यामुळेच पक्षाचे नेतृत्व गांधीविरहित नेत्याकडे सोपवण्याची मागणी किंवा चर्चा झाली की, संघटनेत खळबळ उडते, निषेध सुरू होतो.

दुसरीकडे, भारतीय जनता पक्षासारखे प्रतिस्पर्धी पक्ष आपल्या राजकीय फायद्यासाठी याचा गैरफायदा घेत असल्याचा आरोप होतो. ते अशा प्रकारे प्रचार करतात की काँग्रेस आता देशाच्या स्वातंत्र्यलढ्याचे नेतृत्व करणारा पक्ष राहिलेला नाही. उलट आता हा पक्ष एखाद्या कुटुंबाची प्रायव्हेट लिमिटेड कंपनी झाली आहे, असे विरोधी पक्षाकडून बोलले जाते.

Prashant kishor sonia gandhi
जम्मूतील चढ्ढा कॅम्पजवळ CISFच्या बसवर दहशतवादी हल्ला, ASI जवान शहीद तर 8 जखमी

प्रशांत किशोर काय म्हणतात?

'गांधी, बिगर-गांधी' या दोन प्रकारच्या गोष्टी समोर आल्यावर वार्ताहरांनी सत्य जाणून घेण्याचा प्रयत्न केला. त्यासाठी काँग्रेसच्या काही वरिष्ठ नेत्यांशी संपर्क साधण्यात आला. मात्र हे प्रकरण संवेदनशील असल्याने कोणीही उघडपणे काहीही बोलले नाही. 'द इंडियन एक्स्प्रेस'ला मिळालेल्या माहितीनुसार, बिगर गांधी व्यक्तीकडे पक्षाचे नेतृत्व सोपवण्याचा प्रशांत यांचा प्रस्ताव कालबाह्य असू शकतो. यावेळी त्यांच्या सादरीकरणात तसा कोणताही प्रस्ताव नाही.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com