Hardik Patel
Hardik Patel Dainik Gomantak
देश

हार्दिक पटेल सोडणार काँग्रेस? ट्विटर बायोमधून हटवले पक्षाचे नाव

दैनिक गोमन्तक

गुजरातमध्ये पुढील वर्षी विधानसभा निवडणुका होणार आहेत. तत्पूर्वीच राज्यातील राजकारण तापू लागलं आहे. मागील काही दिवसांपासून नाराज असणाऱ्या काँग्रेसच्या गुजरात युनिटचे कार्याध्यक्ष हार्दिक पटेल यांनी सोमवारी त्यांच्या ट्विटर प्रोफाइलवरुन पद आणि पक्षाचे निवडणूक चिन्ह 'हात' काढून टाकले. या वर्षाच्या अखेरीस होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपूर्वी (Assembly Elections) ते पक्ष सोडू शकतात. हार्दिक यांनी काही दिवसांपूर्वी पक्षाच्या राज्य नेतृत्वाच्या कार्यशैलीबद्दल नाराजी व्यक्त केली होती. पाटीदार समाजाच्या आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या हार्दिक यांनी ट्विटरवरील त्यांच्या नवीन प्रोफाइलमध्ये स्वत:ला "गौरवान्वित भारतीय देशभक्त" म्हणून उल्लेख केला आहे. (Hardik Patel has removed his post and party election symbol from his Twitter profile)

दरम्यान, गुजरात काँग्रेसने (Congress) हार्दिक पटेल यांना मतभेद दूर करण्यासाठी चर्चेसाठी आमंत्रित केले आहे. गुजरात प्रदेश काँग्रेस कमिटीचे (GPCC) प्रमुख जगदीश ठाकोर यांनी याबाबत मीडियाला माहिती दिली. दुसरीकडे, हार्दिक यांनी नुकतीच जाहीररित्या पक्षाविरोधात नाराजी व्यक्त करुन गुजरातमधील सत्ताधारी भारतीय जनता पक्षाचे कौतुक केले होते. हार्दिक काँग्रेसच्या राज्य नेतृत्वावर नाराज असून गुजरातमधील पक्षाच्या कारभारावर ते जाहीरपणे नाराजी व्यक्त करत आहे. गुजरातमध्ये वर्षाच्या अखेरीस विधानसभा निवडणुका होणार आहेत.

तसेच, कॉंग्रेसवर टीका केल्यानंतर हार्दिक यांनी सत्ताधारी भारतीय जनता पक्षाच्या (BJP) "निर्णय क्षमतेबद्दल" प्रशंसा केली होती. त्यांनी म्हटले होते की, विरोधी पक्षाच्या (Congress) राज्य युनिट नेतृत्वात निर्णय घेण्याची क्षमता कमी आहे. काँग्रेसच्या गुजरात युनिटचे कार्याध्यक्ष पटेल यांनी देखील "हिंदू असल्याचा मला अभिमान आहे" असेही म्हटले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

ऐतिहासिक! गोव्यात पहिल्यांदाच लोकसभेसाठी सर्वाधिक मतदान, 17.82 कोटींचा मुद्देमाल जप्त

Goa Loksabha 2024: निकालापूर्वीच काँग्रेसने मानली हार; मुख्यमंत्री सावंत यांचा गौप्यस्फोट

Sam Pitroda: सॅम पित्रोदा 'एक्स'वर ट्रेंडिंग, वादग्रस्त वक्तव्यानंतर मीम्सचा पाऊस

Goa Today's Top News: राज्यातील ठळक बातम्यांचा आढावा एका क्लिकवर

Bangalore Yellow Alert News: IMD कडून बंगळुरुमध्ये ‘यलो अलर्ट’ जारी; मुसळधार पावसासह वादळी वाऱ्याची शक्यता

SCROLL FOR NEXT