Hardik Pandya Century Dainik Gomantak
देश

VIDEO: 6,6,6,6,6,4... हार्दिक पांड्याची तुफान फटकेबाजी; एकाच ओव्हरमध्ये ठोकले 5 षटकार; विजया हजारे ट्रॉफीत वादळी शतक

Hardik Pandya Century: विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोदा संघाकडून खेळताना हार्दिकने विदर्भ विरुद्ध अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचे चित्र पालटले.

Sameer Amunekar

झीलंडविरुद्धच्या आगामी एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची निवड आज होणार आहे. या निवडीच्या काही तास आधीच स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने आपल्या बॅटने निवडकर्त्यांना चोख प्रत्युत्तर दिले आहे. राजकोटच्या निरंजन शाह स्टेडियमवर सुरू असलेल्या विजय हजारे ट्रॉफीमध्ये बडोदा संघाकडून खेळताना हार्दिकने विदर्भ विरुद्ध अवघ्या काही चेंडूंमध्ये सामन्याचे चित्र पालटले. त्याने एकाच षटकात सलग ५ षटकार आणि १ चौकार मारत आपले शतक पूर्ण केले.

३९ व्या ओव्हरमध्ये पांड्याचं वादळ

बडोद्याच्या डावातील ३९ वी ओव्हर ऐतिहासिक ठरली. हार्दिक पांड्या तेव्हा ६२ चेंडूत ६६ धावांवर खेळत होता. विदर्भाकडून डावखुरा फिरकीपटू पार्थ रेखडे गोलंदाजीसाठी आला. हार्दिकने पहिल्या पाच चेंडूंवर सलग ५ गगनभेदी षटकार खेचले.

शेवटच्या चेंडूवर चौकार मारून त्याने अवघ्या ६ चेंडूंत ३४ धावा वसूल केल्या आणि आपले शतक पूर्ण केले. ६६ वरून थेट १०० धावांपर्यंत पोहोचण्याचा त्याचा हा वेग पाहून प्रेक्षक आणि मैदानातील खेळाडूही अवाक झाले.

आक्रमक खेळी

हार्दिकने आपल्या खेळीची सुरुवात अतिशय सावध केली होती, त्याने ४४ चेंडूंत अर्धशतक पूर्ण केले होते. मात्र, एकदा का लय सापडल्यानंतर त्याने विदर्भाच्या गोलंदाजांचा धुव्वा उडवला. हार्दिक ९२ चेंडूंमध्ये १३३ धावांची खेळी करून बाद झाला.

या स्फोटक खेळीत त्याने ११ षटकार आणि ८ चौकारांची आतषबाजी केली. हार्दिकच्या या शतकामुळे बडोद्याने निर्धारित ५० षटकांत ९ गडी गमावून २९३ धावांपर्यंत मजल मारली. बडोद्याच्या इतर फलंदाजांना फारशी चमक दाखवता आली नाही; विष्णू सोलंकीने २६, तर कर्णधार कृणाल पांड्याने २३ धावांचे योगदान दिले.

विदर्भाची गोलंदाजी

विदर्भाकडून यश ठाकूरने सर्वाधिक ४ बळी घेतले, ज्यात हार्दिकच्या महत्त्वाच्या विकेटचा समावेश होता. मात्र, हार्दिकने पार्थ रेखडेच्या एका षटकात केलेल्या धुलाईमुळे पार्थने १० षटकांत ८० धावा मोजल्या. हार्दिकची ही खेळी अशा वेळी आली आहे, जेव्हा भारतीय संघात त्याच्या पुनरागमन आणि फिटनेसवर चर्चा सुरू आहे. आज होणाऱ्या बीसीसीआयच्या बैठकीत हार्दिकच्या या शतकाचा नक्कीच सकारात्मक परिणाम दिसून येऊ शकतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT