Hardik Pandya, Jasmin Walia Break Up Dainik Gomantak
देश

Hardik Pandya Break Up: 'क्रिकेटचा हार्ड हिटर' प्रेमात मात्र क्लीन बोल्ड, पांड्याचं वर्षभरातच दुसऱ्यांदा तुटलं नातं, गर्लफ्रेंडनं केला ब्रेकअप?

Hardik Pandya, Jasmin Walia Break Up: क्रिकेटपटू हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. दोघांनीही इंस्टाग्रामवर एकमेकांना अनफॉलो केले आहे.

Sameer Amunekar

Hardik Pandya, Jasmin Walia Relationship

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पंड्या आणि ब्रिटिश-भारतीय गायिका जास्मिन वालिया पुन्हा एकदा चर्चेत आहेत. पण, यावेळी बातमी अशी आहे की दोघांचे ब्रेकअप झाले आहे. हार्दिक आणि जास्मिनचे नाते एका वर्षातच तुटले आहे. दोघांनीही एकमेकांना इंस्टाग्रामवर अनफॉलो केले आहे. जास्मिन वालिया नेमकी आहे तरी कोण? चला जाणून घेऊया

क्रिकेटपटू हार्दिक पांड्या केवळ त्याच्या खेळामुळेच नाही तर त्याच्या अफेअर्स आणि लिंक-अपमुळेही चर्चेत असतो. गेल्या काही काळापासून त्याचे नाव ब्रिटिश गायिका जास्मिन वालियाशी जोडले जात होते. आयपीएल दरम्यान जास्मिन अनेक वेळा हार्दिकला पाठिंबा देताना दिसली होती.

जास्मिन मुंबई इंडियन्सच्या बसमध्येही दिसली होती. त्यांची प्रेमकहाणी नुकतीच सुरू झाली होती आणि आता त्यांच्या ब्रेकअपच्या बातम्या येत आहेत. दोघांनीही सोशल मीडिया प्लॅटफॉर्म इंस्टाग्रामवरून एकमेकांना अनफॉलो केले आहे.

बऱ्याच काळापासून हार्दिक पांड्या आणि जास्मिन वालिया एकमेकांना डेट करत असल्याच्या बातम्या येत होत्या. मात्र, दोघांपैकी कोणीही ते नात्यात असल्याचं स्वीकारलं नव्हतं. प

पण, आता ताज्या रिपोर्ट्सनुसार, हार्दिक आणि जास्मिनचे ब्रेकअप झाले आहे. ही बातमी इन्स्टाग्रामवरून मिळाली. दोघांनीही एकमेकांना अनफॉलो केल्याचे दिसून आले, ज्याचा स्क्रीनशॉटही सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

हार्दिक पंड्याने त्याची माजी पत्नी नताशाशी घटस्फोट घेतल्याची घोषणा केली तेव्हा त्याचे नाव जास्मिन वालियाशी जोडले गेले होते. त्यानंतर दोघांमधील नाते पक्के मानले गेले. हार्दिक आणि जास्मिनने त्याच ठिकाणाहून त्यांच्या ग्रीस ट्रिपचे फोटो शेअर केले.

याशिवाय, जास्मिन अनेकदा हार्दिकला त्याच्या सामन्यांमध्ये चीअर करताना दिसली. दुबईमध्ये झालेल्या भारत-पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या सामन्यातही ती स्टँडमध्ये उभी राहून दिसली होती.

जास्मिन वालिया ही एक ब्रिटिश-भारतीय गायिका आणि मॉडेल आहे. तिचा जन्म इंग्लंडमध्ये झाला. पण, तिचे पालक भारतातील आहेत. जास्मिनला 'द ओन्ली वे इज एसेक्स' या रिअॅलिटी शोमधून प्रसिद्धी मिळाली.

त्यानंतर तिने स्वतःचे यूट्यूब चॅनल सुरू केले, जिथे ती इतरांच्या गाण्यांना आवाज देत असे आणि व्हिडिओ अपलोड करत असे, जे चाहत्यांना खूप आवडते. जास्मिनने कार्तिक आर्यनच्या 'सोनू के टीटू की स्वीटी' चित्रपटातील 'बॉम डिगी डिगी' हे गाणे गायले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Vasco Landslide: वाडे-वास्‍कोत कोसळली दरड! घराला धोका; कुटुंब जगतेय भीतीच्‍या छायेखाली

Goa Politics: काँग्रेस,‘आप’मधील दरी वाढणार! निरीक्षकांचा अंदाज; ‘झेडपी’त दोन्ही पक्ष स्वबळाच्या तयारीत

Goa Tourism: गोव्यात 54 लाख पर्यटक! सहा महिन्यात विक्रमी भरारी; पर्यटनाचा नवा उच्चांक नोंद

Goa Politics: खरी कुजबुज; पेडण्यातली भुताटकी

Forced Conversion: हातात AK47 घेऊन फोटो! सक्तीने 'धर्मांतरण' करणाऱ्या रॅकेटचा पर्दाफाश; गोव्यातील महिलेसह 10 जणांना अटक

SCROLL FOR NEXT