Gym Dainik Gomantak
देश

नियमित जीमला जाणाऱ्यांना हृदयविकाराचा धोका का? भारतातील नामवंत डॉक्टरांनी दिले उत्तर

गेल्या महिन्यात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (41) आणि गेल्या वर्षी अभिनेता चिरंजीवी सर्जा (36) यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले.

दैनिक गोमन्तक

तंदुरुस्त कोणाला मानले जाते? जो तरुण आहे, ज्याचे शरीर निरोगी आहे, आणि दैनंदिन जीममध्ये जातो? मात्र आपल्यापैकी बहुतेकांच्या मनात असलेली ही समज अलीकडच्या घडामोडींमुळे पूर्णत:ह फोल ठरत आहे. उदाहरणार्थ, कन्नड सुपरस्टार पुनीत राजकुमारच्या (Puneet Rajkumar) केसचाच विचार करा. 46 वर्षीय वय असलेला हा एकमेव बळी नाही. गेल्या महिन्यात अभिनेता सिद्धार्थ शुक्ला (41) आणि गेल्या वर्षी अभिनेता चिरंजीवी सर्जा (36) याचाही हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल होते.

"20-25 वर्षांपूर्वी, 30 वर्ष आणि त्यापेक्षा कमी वयातील लोकांना 6 महिन्यांत एकदाच हृदयविकाराचा झटका येत असल्याचे दिसायचे, परंतु आता दर आठवड्याला अशा केसेस समोर येते असल्याचे, डॉ. रमाकांत पांडा यांनी माध्यमाशी बोलताना सांगितले.

पद्मभूषण पुरस्कार विजेते आणि भारतातील सर्वोत्कृष्ट हृदय शल्यचिकित्सकांपैकी एक असलेले डॉ. पांडा यांनी या गोष्टीकडे लक्ष वेधले की, व्यायामाचे चांगले आणि वाईट परिणाम आहेत. योग्य व्यायामासाठी खालील टीप्सचा तुम्ही आधार घेऊ शकता.

टिप्स:

5-10 मिनिटे वॉर्म-अप करायला हवा.

20-30 मिनिटे व्यायाम करा.

व्यायामानंतर शरीर थंड करण्यासाठी 5-10 मिनिटे द्या.

डॉ पांडा पुढे म्हणाले, "लोकांनी शरीराचे कार्य कसे चालते याचा अभ्यास करावा. छातीच्या डाव्या बाजूला दुखत असेल, सांधे दुखत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करु नये. विशेषत: जेव्हा कुटुंबात याआधी एखाद्या सदस्याने अशाप्रकारचा त्रास सहन केला असेल तर तात्काळ डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Politics: जाहीर सभेसाठी आम्हाला सरकारने जागा नाकारली, खासगी जागेवर सभेचे आयोजन करावं लागलं; चोडणकरांचा आरोप

Military Dog Tyson: लष्कराचा श्वान ‘टायसन’ला शौर्यसन्मान, गोळी झाडल्यानंतरही दहशतवाद्यांवर केला होता हल्ला

अमेरिकेत 'इंडिया डे'चा धमाका! 80व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त न्यू यॉर्कची 'अँपायर स्टेट बिल्डींग' झाली तिरंगामयी; तारक मेहताच्या कलाकारांची खास उपस्थिती

Goa Crocodile Video: गोव्यात घरात घुसली भलीमोठी मगर; कुटुंबाची उडाली तारांबळ, वन विभागाकडून मगरीची सुरक्षित सुटका

PM Modi Mental Naxalism Statement: मोदींच्या ‘बौद्धिक नक्षली’ उल्लेखावरून रणकंदन; विरोधकांचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

SCROLL FOR NEXT