Guru Purnima Wishes In Marathi
भारतीय संस्कृतीत गुरूला परमेश्वराच्या समकक्ष स्थान दिले गेले आहे. गुरू म्हणजे जीवनातील अंधार दूर करून ज्ञानाचा प्रकाश देणारा दीपस्तंभ. अशा गुरूंच्या स्मरणासाठी आणि त्यांच्या ऋणाची जाणीव ठेवण्यासाठी साजरा केला जाणारा उत्सव म्हणजे गुरूपौर्णिमा.
गुरूपौर्णिमा हा दिवस महर्षी व्यास यांच्या जन्मदिनी साजरा केला जातो. त्यांनी वेदांचे विभाजन, महाभारताची रचना आणि अनेक पुराणांचे लेखन केले. म्हणून त्यांना 'व्यासमुनि' किंवा 'वेदव्यास' असेही म्हटले जाते. भारतीय संस्कृतीत त्यांना ‘आदिगुरू’ मानले जाते. या दिवशी विद्यार्थ्यांनी आपल्या गुरूंकडे जाऊन ज्ञानाबद्दल कृतज्ञता व्यक्त करावी, असे मानले जाते.
गुरूंचं पूजन: विद्यार्थ्यांनी गुरूंच्या पाया पडून त्यांचं पूजन केलं जातं.
ध्यान, मंत्रजप आणि सत्संग: अनेक ठिकाणी ध्यानधारणा, प्रवचनं, व्रत-पूजा, हवन यांचं आयोजन केलं जातं.
शाळा-कोलेजमध्ये विशेष कार्यक्रम: गुरूपौर्णिमेच्या दिवशी विद्यार्थ्यांनी गुरूंसाठी भाषणं, नृत्य, कविता इ. सादर करून आपली भावना व्यक्त केली जाते.
आधुनिक गुरू-शिष्य नातं: आज शिक्षक, मार्गदर्शक, पालक, कोच, स्पिरिच्युअल गुरू अशा विविध स्वरूपात गुरूंची ओळख निर्माण होते.
पूर्वी गुरूकुल पद्धती होती. शिष्य गुरूकडे राहून शिक्षण घेत असे. आज काळ बदलला असला तरी शिष्यत्वाचे तत्त्व कायम आहे. ऑनलाईन शिक्षण, मार्गदर्शक संस्था, मोटिवेशनल स्पीकर्स यांच्यामार्फत गुरूपणाची नवी व्याख्या घडते आहे.
आज गुरूपौर्णिमा ही केवळ धार्मिक परंपरा न राहता ती ध्येयप्रेरणा, ज्ञानविकास आणि आत्मिक उन्नतीचा एक जागर बनला आहे. सोशल मीडियावर "Thank You Teacher", "Happy Guru Purnima" असे मेसेज शेअर केले जातात. पण फक्त शब्द नव्हे, तर आचरणातून गुरूंच्या शिकवणीची जाणीव ठेवणे, हीच खरी गुरूपौर्णिमा आहे.
खाली गुरूपौर्णिमेसाठी आकर्षक आणि भावनिक 20 शुभेच्छा संदेश दिले आहेत. Guru Purnima 2025 Wishes In Marathi
गुरू म्हणजे ज्ञानाचं तेज… त्या तेजाला आज नमन! गुरूपौर्णिमेच्या शुभेच्छा!
जिथे गुरू आहेत, तिथे अंध:कार नाही. शुभ गुरूपौर्णिमा!
गुरूंचा आशीर्वाद लाभावा, ज्ञानाचा प्रकाश लाभावा… हीच प्रार्थना!
जीवनाचं खरं मार्गदर्शन करणारा गुरू, प्रत्येक यशामागचा खरा हात… गुरूपौर्णिमेच्या मंगल शुभेच्छा!
गुरू म्हणजे वाट दाखवणारा दीपस्तंभ… आज त्या दीपाला नमस्कार!
ज्ञान, संयम, आणि संस्कार देणाऱ्या गुरूंना साष्टांग दंडवत! गुरूपौर्णिमा निमित्त शुभेच्छा!
गुरू हा वाट दाखवतो… यश तुमचं बनवतो! गुरूपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
गुरूंच्या शिकवणीतून घडतं आयुष्य… अशा गुरूंना वंदन!
ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या गुरूंना सादर प्रणाम!
गुरूपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनातील प्रकाशपथकाला स्मरण करण्याचा दिवस.
जो अंधारातही वाट दाखवतो, तोच खरा गुरू… गुरूपौर्णिमा निमित्त वंदन!
गुरू हेच खरे मार्गदर्शक; त्यांच्या कृपेने आयुष्य उजळते!
ज्ञानाचा दीप प्रज्वलित करणाऱ्या गुरूंना सादर प्रणाम!
गुरूपौर्णिमा म्हणजे आपल्या जीवनातील प्रकाशपथकाला स्मरण करण्याचा दिवस.
जो अंधारातही वाट दाखवतो, तोच खरा गुरू… गुरूपौर्णिमा निमित्त वंदन!
गुरू हेच खरे मार्गदर्शक; त्यांच्या कृपेने आयुष्य उजळते!
गुरूंच्या आशीर्वादाने अज्ञान दूर होऊन ज्ञानाचं तेज पसरतं…
गुरू म्हणजे आपुलकी, गुरू म्हणजे प्रेरणा, गुरू म्हणजे जगण्याची कला!
गुरूपौर्णिमा हा दिवस आहे मनोभावे कृतज्ञता व्यक्त करण्याचा!
गुरूचं अस्तित्वच आपल्या आयुष्याला अर्थ देतं… गुरूपौर्णिमा साजरी करूया त्यांच्या आठवणीने!
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.