Gujrat Road Accident Dainik Gomantak
देश

Gujrat Road Accident: भावनगरमध्ये रक्ताचा सडा! भरधाव बोलेरोची ट्रेलरला जोरदार धडक, 6 जणांचा मृत्यू; एकजण देतोय मृत्यूशी झुंज VIDEO

Bhavnagar Road Accident News: गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात आज (6 ऑक्टोबर) सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 6 जण मृत्यू पावले.

Manish Jadhav

Bhavnagar Road Accident News: गुजरातमधील भावनगर जिल्ह्यात आज (6 ऑक्टोबर) सकाळी एक अत्यंत भीषण अपघात झाला, ज्यामध्ये 6 जण मृत्यू पावले. तर एकजण गंभीर जखमी झाला. त्रापज गावाजवळ भरधाव वेगात असलेली बोलेरो पाठीमागून ट्रेलरला धडकली, ज्यामध्ये गाडीचा अक्षरशः चुराडा झाला. या अपघातात बोलेरोमधून प्रवास करणारे अलंग शिपब्रेकिंग यार्डचे 6 कर्मचारी जागीच ठार झाले.

दरम्यान, धडक एवढी जबरदस्त होती की कारची खिडकी तुटल्यामुळे एक व्यक्ती बाहेर फेकला गेला आणि गंभीररित्या जखमी झाला. पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने जखमीला तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केले, तर 6 जणांचे मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमार्टमसाठी पाठवले.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या अपघातात (Accident) जीव गमावलेल्या अलंग शिपब्रेकिंग यार्डच्या सर्व सहाही कर्मचाऱ्यांची ओळख पटली. मृतांमध्ये विजयभाई, साधुभाई, जिग्नेशभाई, भार्गवभाई, हिरेनभाई आणि योगेशभाई यांचा समावेश आहे. या दुर्देवी घटनेची माहिती मिळताच कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तात्काळ घटनास्थळी दाखल झाले, तर मृत कर्मचाऱ्यांच्या घरी शोककळा पसरली असून कुटुंबीयांवर मोठा आघात झाला. अपघातात गंभीर जखमी झालेल्या व्यक्तीचे नाव जयेशभाई असून, स्थानिकांनी त्याला सुरुवातीला भावनगर येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले, मात्र प्रकृती चिंताजनक असल्याने प्राथमिक उपचारानंतर तात्काळ शहरातील एका मोठ्या खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले.

विशेष म्हणजे, कालच (5 ऑक्टोबर) खेडा जिल्ह्यातील मातर-तारामपूर रस्त्यावरही एक भीषण अपघात घडला. खोडियार चौकाजवळ एका ईको कारने प्रवाशांनी भरलेल्या रिक्षाला जोरदार धडक दिली. त्या दुर्घटनेत रिक्षातील 3 प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला तर 4 जण गंभीर जखमी झाले. या सलग घडलेल्या अपघातांच्या घटनांमुळे गुजरातमध्ये वाहनचालकांचा अतिवेग आणि सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून नागरिकांमधून हळहळ व्यक्त होत आहे.

SIR Guidelines: 'एसआयआर'च्या मार्गदर्शक तत्त्वांना सुप्रीम कोर्टाची कायदेशीर मान्यता? निवडणूक आयोगाच्या वकिलांचा दावा; गोवा खंडपीठात आजही सुनावणी सुरु

Gaza Revenge Plot Exposed: गाझाचा बदला घेण्यासाठी रचला कट, फ्लाईदुबईच्या को-पायलटचा धक्कादायक खुलासा, म्हणाला, 'मला शहीद व्हायचे होते'

Women Cricket: 'बेधडक खेळा, प्रतिस्पर्ध्यांचा दबाव घेऊ नका'; गोव्याच्या महिला क्रिकेटपटूंच्या मानसिकतेवर प्रशिक्षक पुष्पांजली बॅनर्जींचा भर

VIDEO: 'हा खरंच अभिषेक शर्मा आहे?' तरुणीला विश्वासच बसेना; थेट 'Can I Touch You?' म्हणत स्पर्श केला अन्... पाहा व्हिडिओ व्हायरल

Cooperative Societies: 'सहकार'चा कारभारच अनिश्चित; 5,853 संस्थांपैकी 3,357 संस्थांची आर्थिक माहितीच सरकारकडे नाही, नफा-तोट्याचे चित्रही अस्पष्ट

SCROLL FOR NEXT