Modi Fan Auto Driver Dainik Gomantak
देश

Modi Fan Auto Driver: केजरीवालांना डिनरला बोलावणारा रिक्षाचालक मोदींचा फॅन

आता म्हणतो, मी तर मोदींचा फॅन; ऑटो युनियनने सांगितल्यानेच केजरीवालांना डिनरला बोलावले

गोमन्तक डिजिटल टीम

Modi Fan Auto Driver: गुजरातच्या ज्या रिक्षा चालकाच्या घरी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Arvind Kejriwal) डिनरसाठी गेले होते, तो रिक्षाचालक शुक्रवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या (PM Narendra Modi) अहमदाबाद येथे झालेल्या सभेत भाजपला पाठिंबा देताना दिसून आला. विक्रम दंतानी असे या रिक्षाचालकाचे नाव आहे.

विक्रमने या सभेवेळी भाजपच्या नावाचा केशरी रंगाचा स्कार्फ गळ्यात घातला होता, तसेच भाजपच्या नावाची टोपीही परिधान केली होती. विशेष म्हणजे, स्वतःला आधी केजरीवालांचा फॅन असल्याचे सांगितलेल्या विक्रमने या सभेवेळी, आम्ही तर मोदी साहेबांचे चाहते आहोत, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.

विक्रम म्हणाला की, आमची संपुर्ण कॉलनीच भाजपला मत देते. ऑटो युनियनने सांगितल्यामुळे अरविंद केजरीवाल यांना डिनरसाठी आमंत्रित केले होते. पण भाजपसाठी आम्ही जे करत होतो ते यापुढेही करत राहू. मी भाजपच्या कार्यक्रमांना जात असतो.

आम्ही आधीपासूनच भाजपशी जोडले गेलेलो आहोत आणि नेहमी भाजपलाच पाठिंबा देत राहू. केजरीवालांसोबत डिनरनंतर मला कुणाचाही फोन आलेला नाही, आणि कुणाशी चर्चाही झालेली नाही.

गुजरात विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर अरविंद केजरीवाल यांनी 13 सप्टेंबर रोजी गुजरात दौरा केला होता. त्यावेळी त्यांनी अहमदाबाद येथील ऑटो रिक्षा चालकांच्या सभेला संबोधित केले होते.

त्यानंतर घाटलोदिया भागातील रिक्षा चालक विक्रम दंतानी याच्या आग्रहामुळे केजरीवाल त्याच्या घरी डिनरसाठी गेले होते. त्यावेळी विक्रमने केजरीवालांना सांगितले होते की, मी तुमचा चाहता आहे. सोशल मीडियात तुमचे अनेक व्हिडिओ पाहिलेले आहेत.

एका व्हिडिओत तुम्ही पंजाबमधील एका रिक्षाचालकाच्या घरी जेवायला गेल्याचे दिसते. मग तुम्ही माझ्या घरीही डिनरसाठी याल का? त्यावर 'आप'चे नेते केजरीवाल यांनी होय, असे सांगत तत्काळ या निमंत्रणाचा स्विकार केला होता. त्यांच्या डिनरचे फोटोही सोशल मीडियात व्हायरल झाले होते. या घटनेनंतर रिक्षाचालक विक्रम दंतानी प्रकाशझोतात आला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope today: अनंत चतुर्दशी 2025, बाप्पाचा 'या' 4 राशींवर राहील आशिर्वाद; आर्थिक आणि कौटुंबिक जीवनात समृद्धी मिळेल

BITS Pilani: उलटीमुळे श्‍‍वास गुदमरून झाला मृत्‍यू, तणावाखालील ऋषीला नव्हता 'बिट्स'चा आधार; पेशंट स्वतःहून उपचारासाठी आला नाही, ही सबब पुढे

Goa: पाण्‍याचा जितका वापर, तितकेच शुल्‍क; पेयजल विभागाची अधिसूचना जारी, घरगुती ग्राहकांना बिलात सवलत

Goa Education: एकशिक्षकी शाळांचा प्रश्न सुटणार; सरकारी शाळांना अतिरिक्त शिक्षक पुरविले जाणार, CM सावंतांची घोषणा

ED Raid: सोनाराने बनावट दागिने ठरवले खरे, तारणाद्वारे 2.63 कोटींची फसवणूक; कोलवा, मुगाळी येथे संशयितांच्‍या घरांवर EDचे छापे

SCROLL FOR NEXT