NASA Images: खगोलीय वस्तूंच्या मनमोहक प्रतिमा नासाकडून शेअर, एकदा पहाच

NASA
NASA NASA Instagram
Published on
Updated on

अमेरीकेच्या अंतराळ संशोधन संस्थेकडून (NASA) काही मनमोहक प्रतिमा प्रसिद्ध केल्या आहेत. स्पेस एजन्सीने सोफियाचा डेटा वापरून एकत्रित केलेल्या प्रतिमा इंस्टाग्रामवर केल्या आहेत. जगातील सर्वात मोठी हवाई दुर्बिणी सोफिया टेलीस्कोपद्वारे या प्रतिमा काढण्यात आल्या आहेत. प्रतिमा पाहून अनेकांनी आश्चर्यकारक प्रतिक्रिया दिल्या आहेत.

NASA
Vladimir Putin: पुतीन यांची मोठी घोषणा, युक्रेनची चार राज्ये रशियात केली विलीन

नासाच्या फ्लाईंग दुर्बिणीने खगोलशास्त्रज्ञांच्या एका गटांसह असंख्य मैलांचा हवाई पल्ला गाठला आहे. "रात्रीच्या अंधारात आणि सकाळच्या प्रकाशात सुमारे 41,000 फूट (12,500 मीटर) प्रवास करत, सोफियाने खगोलीय वस्तूंची चित्तथरारक निरीक्षणे नोंदवली असून आकर्षक प्रतिमा काढल्या आहेत. असे नासाने आपल्या इंस्टाग्राम कॅप्शनमध्ये लिहिले आहे.

यूएस स्पेस एजन्सीने आपल्या एका स्पष्टीकरणाद्वारे असे सांगितले आहे की, पहिली प्रतिमा सेंटॉरस ए ची आहे - नारिंगी आणि गडद लाल धूळ लेन असलेली आकाशगंगा ज्यामध्ये मध्यभागी स्तंभ आणि त्याच्या बाहेरील बाजूने निळ्या रंगाचा एक फिकट कवच आहे. दुसरी पोस्ट ओरियन नेब्युलाचे 3D दृश्य दाखवते, जी तारकीय वाऱ्याने वायू आणि धुळीपासून मुक्त झालेल्या "बबल" सह नेबुलाची तपशीलवार रचना प्रकट करते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com