Modi Kejriwal  Dainik Gomantak
देश

Gujrat Hight Court: PM नरेंद्र मोदींच्या पदवीची माहिती मागणाऱ्या केजरीवालांना न्यायालयाने ठोठावला दंड, कोर्ट म्हणाले...

अशिक्षित किंवा कमी शिक्षित पंतप्रधान देशासाठी खूप धोकादायक आहे. असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

Pramod Yadav

Gujrat High Court Fines Delhi CM Kejriwal: गुजरात उच्च न्यायालयाने शुक्रवारी गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीचे तपशील जाहीर करण्याचे निर्देश देणारा न्यायालयाचा आदेश रद्दबातल ठरवला. अशा माहितीची आवश्यकता नाही असे न्यायालयाने म्हटले आहे.

याशिवाय, गुजरात उच्च न्यायालयाने आम आदमी पार्टीचे (आप) संयोजक आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना माहिती मागितल्याबद्दल 25,000 रुपयांचा दंडही ठोठावला आहे.

अरविंद केजरीवाल यांना ही रक्कम गुजरात राज्य विधी सेवा प्राधिकरणाकडे जमा करावी लागणार आहे. दरम्यान, केंद्रीय माहिती आयोगाने 2016 मध्ये गुजरात विद्यापीठाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पदवीची माहिती देण्याचे निर्देश दिले होते.


याबाबत दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी प्रतिक्रिया दिली आहे. "अशिक्षित किंवा कमी शिक्षित पंतप्रधान देशासाठी खूप धोकादायक आहे." असे केजरीवाल यांनी म्हटले आहे.

केजरीवाल यांनी ट्विटरवर आपली प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. "देशाला हे जाणून घ्यायचा पण अधिकार नाही की त्यांच्या पंतप्रधानांनी किती शिक्षण घेतले आहे? त्यांनी न्यायालयात त्यांची पदवी दाखवण्यास कडाडून विरोध का केला? आणि त्यांची पदवी दाखविण्याची मागणी करणार्‍यांवर दंड का ठोठावला? हे काय चाललंय? अशिक्षित किंवा कमी शिक्षित पंतप्रधान देशासाठी खूप धोकादायक आहे." असे ट्विट केले आहे.

दरम्यान, दिल्लीत पुन्हा एकदा लावण्यात आलेल्या पोस्टर्समध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशाणा साधण्यात आला आहे. भारताचे पंतप्रधान शिक्षित असावेत का? हे पोस्टर्स आम आदमी पार्टीच्या कार्यालयाबाहेर आणि आयटीओ मेट्रो स्टेशनच्या बाहेर लावण्यात आले आहेत. याआधी दिल्लीत 'मोदी हटाओ देश बचाओ'चे पोस्टर्स लावण्यात आले होते. याप्रकरणी दिल्ली पोलिसांनी तातडीने कारवाई केली आहे.

याआधी राजधानी दिल्लीत पंतप्रधान मोदींविरोधात वादग्रस्त पोस्टर लावण्यात आले होते. पोस्टरवर प्रिंटिंग प्रेसचा तपशील उपलब्ध नसल्याप्रकरणी एकूण 138 एफआयआर दाखल करण्यात आले होते. यातील वादग्रस्त पोस्टरबाबत पंतप्रधान मोदींवर 36 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. एवढेच नाही तर पोलिसांनी 6 जणांना अटकही केली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Karthik Aaryan In Goa: 'रुह बाबा'नं पुन्हा जिंकलं चाहत्यांचं मन; गोव्यात एन्जॉय करतानाचे फोटो केले शेअर!

Winter Care Tips: हिवाळ्यात त्वचेची घ्या विशेष काळजी; 'हे' घरगुती उपाय नक्की ट्राय करा!

Margao Police: हुल्लडबाजांना चाप; मडगाव पोलिसांनी जप्त केल्या मॉडिफाईड बुलेट

South Goa Beach: दक्षिण गोव्यातील समुद्र किनाऱ्यांची धूप वृध्दी सुरुच; राष्ट्रीय अभ्यासातून खुलासा!

Shruti Prabhugaonkar: गोमंतकीयांना कोट्यवधी रुपयांना गंडवणाऱ्या श्रुतीला अवघ्या १० दिवसात जामीन

SCROLL FOR NEXT