Manish Sisodia & Arvind Kejriwal Dainik Gomantak
देश

Delhi Politics: 'केजरीवालांची हत्या होऊ शकते', मनीष सिसोदियांचा भाजपवर गंभीर आरोप

Manish Sisodia: दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) मोठा आरोप केला आहे.

दैनिक गोमन्तक

Manish Sisodia Statement: दिल्लीचे उपमुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते मनीष सिसोदिया यांनी भारतीय जनता पक्षावर (भाजप) गंभीर आरोप केला आहे. सिसोदिया म्हणाले की, 'भाजप मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट रचत आहे.'

दरम्यान, भाजप नेते मनोज तिवारी यांच्या वक्तव्यानंतर सिसोदिया यांनी हे वक्तव्य केले आहे, ज्यात त्यांनी अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला होऊ शकतो, असे म्हटले आहे. मी देशाच्या गृहमंत्र्यांकडे त्यांना सुरक्षा देण्याची मागणी करतो, कारण लोक त्यांच्यावर हल्ला करतील, असेही सिसोदिया म्हणाले.

दुसरीकडे, दिल्लीच्या उपराज्यपालांनी मनीष सिसोदिया यांच्या वक्तव्याची दखल घेतली आहे. एलजी व्हीके सक्सेना यांनी पोलिस आयुक्तांना अशा घटना - आयोजन किंवा अन्यथा - शक्य तितक्या प्रमाणात घडू नयेत याची खात्री करण्यास सांगितले आहे.

हे आहे सिसोदिया यांचे संपूर्ण विधान

मनीष सिसोदिया यांनी ट्विटमध्ये म्हटले की, "गुजरात आणि एमसीडी निवडणुकीतील पराभवाच्या भीतीने भाजपला धास्ती भरली आहे. त्यामुळे भाजप अरविंद केजरीवाल यांना मारण्याचा कट रचत आहे. भाजप खासदार मनोज तिवारी उघडपणे त्यांच्या गुंडांना अरविंद केजरीवाल यांच्यावर हल्ला करण्यास सांगत आहेत. विशेष म्हणजे, त्यांनी त्यासाठी पूर्ण नियोजन केले आहे. मात्र, 'आप'ला त्यांच्या क्षुद्र राजकारणाची भीती नाही, आता जनता त्यांच्या गुंडगिरीला उत्तर देईल.''

तसेच, मनीष सिसोदिया यांच्या ट्विटपूर्वी मनोज तिवारी यांनी ट्विट करत म्हटले होते की, "मला अरविंद केजरीवाल जींच्या सुरक्षेची काळजी वाटत आहे, कारण सतत भ्रष्टाचार, तिकीट विक्री आणि तुरुंगात बलात्कार करणाऱ्यांशी मैत्री आणि मसाज यामुळे आपचे कार्यकर्ते आणि जनता संतप्त आहे. दुसरीकडे, त्यांच्या आमदारालाही मारहाण झाली, त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांसोबत असे काही होऊ नये..''

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Marriage Certificate: गोव्यात 'डेस्टिनेशन वेडिंग' करणाऱ्यांसाठी मोठी खूषखबर; आता राज्यातच मिळणार मॅरेज सर्टिफिकेट! CM सावंतांची घोषणा

Robbery Case: तोंड बांधून आले, चाकू-गोफणीचा धाक दाखवून लुटले! अखेर ‘पारधी गँग’ कळंगुट पोलिसांच्या ताब्यात; मध्य प्रदेशच्या जंगलात धाडसी कारवाई

Goa Chief Minister Statement: 'पुढील वर्षीही गोव्यात सत्तेचा सारथी मीच'! आयर्नमॅन स्पर्धेच्या मंचावरुन CM सावंतांचे सूचक वक्तव्य

Horoscope 2 November 2026: लाभ, प्रगती आणि संयमाची सांगड घालणारा आजचा दिवस!  'या' राशींच्या नशिबाला मिळणार नवी दिशा; चंद्र-मंगळची युती ठरणार वरदान

Ranji Trophy: गोव्याविरुद्धच्या रणजी सामन्यापूर्वी बिहार संघात मोठी उलथापालथ! सकिबुल गनीकडून कर्णधारपद काढून घेतलं, मंगल महरौर करणार नेतृत्व

SCROLL FOR NEXT