Gujarat Crime Dainik Gomantak
देश

Gujarat: धक्कादायक! क्षणात छाटली दोघांची मुंडकी अन् हवनकुंडात दिली आहुती; 21 व्या शतकातही नरबळीची घटना

Gujarat Crime: गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे.

Manish Jadhav

Gujarat Crime: गुजरातमधील राजकोटमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. राजकोट जिल्ह्यात हेमुभाई नावाच्या एका व्यक्तीने आणि त्याच्या पत्नीने 'गिलोटिन' सारख्या यंत्राचा वापर करुन आपले डोके कापून आत्महत्या (Suicide) केली.

राजकोट पोलिसांनी रविवारी ही माहिती दिली. आत्महत्या केलेल्या जोडप्याने स्वत: घरी गिलोटिनसारखे यंत्र बनवले होते, असेही पोलिसांनी सांगितले.

दरम्यान, हेमुभाई मकवाना (38) आणि त्यांची पत्नी हंसाबेन (35) यांनी विंछिया गावातील त्यांच्या शेतातील झोपडीत ही आत्महत्या केली, अशी माहिती विंछिया पोलिस (Police) स्टेशनचे उपनिरीक्षक इंद्रजितसिंग जडेजा यांनी दिली. घटनास्थळी एक सुसाईड नोट सापडल्याचेही त्यांनी सांगितले.

मुलांना मामाच्या घरी सोडले

मृत व्यक्तीच्या भावाने सांगितले की, 'दोघेही दोन दिवसांपूर्वी मुला-मुलीला मामाच्या घरी सोडून आले होते. मुले अनेकदा मामाच्या घरी जात असत. त्यामुळे ही काही असामान्य गोष्ट नव्हती. होय, हे खरे आहे की, गेल्या एक वर्षापासून दादा आणि वहिनी रोज झोपडीत पूजा करत होते. पण, दोघंही असं काही करतील याची कुणालाही कल्पना नव्हती.'

सुसाईड नोटमध्ये काय लिहिले आहे

घटनास्थळी एक सुसाइड नोट मिळाली आहे. सुसाईड नोटमध्ये लिहिले होते की, 'जय भगवान, जय भोलेनाथ, आम्ही दोघेही स्वेच्छेने स्वतःच्या हाताने आपल्या प्राणांची आहुती देत ​​आहोत.

आमच्या कुटुंबातील इतर सदस्य खूप चांगले आहेत. माझा भाऊही आमच्यावर खूप प्रेम करतो. आजपर्यंत त्याने माझ्या बायकोला कधीच चुकीचे बोलले नाही. ते सर्व आमची खूप काळजी घेतात. त्यामुळे त्यांची कोणत्याही प्रकारे चौकशी होऊ नये. आपण स्वेच्छेने आपले जीवन संपवत आहोत. त्यामुळे आमच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याला त्रास देऊ नका.'

याशिवाय, भावाने आमच्या मुलीची काळजी घ्यावी, असेही सुसाईड नोटमध्ये लिहिले आहे. ही सुसाईड नोट भिंतीवर चिकटवली होती. मृताच्या कुटुंबीयांकडून मिळालेल्या माहितीनुसार, सुसाईड नोटचे हस्ताक्षर हे 38 वर्षीय हेमुभाई मकवाना यांचे आहे.

खून-आत्महत्या या दोन्ही कोनातून पोलीस तपास करत आहेत

या प्रकरणाचा तपास करणाऱ्या पोलीस अधिकाऱ्याने सांगितले की, सध्या दोघांचेही मृतदेह पोस्टमॉर्टमसाठी पाठवण्यात आले आहेत. गुन्हा दाखल केल्यानंतर दोघांनी कोणाच्या सांगण्यावरुन हे पाऊल उचलले याचाही तपास सुरु आहे. ही हत्याच नाही का? पोलीस अशा सर्व बाजूंनी बारकाईने तपास करत आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT