Pakistan Afraid Of BJP's Victory In Gujarat: भारताची प्रगती आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची ताकद या दोन्हींची पाकिस्तानला भीती वाटते. याचे कारण भारतात प्रबळ बहुमताचे सरकार आल्यास धोरणांमध्ये फारशी लवचिकता येणार नाही, त्यामुळे पाकिस्तानी एक्सपर्ट चिंतेत आहेत. 2024 ची चर्चा पाकिस्तानात सुरु झाली आहे. पाकिस्तानमध्ये अशी अफवा आहे की, 2024 पूर्वी भारत पीओके परत घेईल. 8 डिसेंबरला आलेल्या गुजरात विधानसभा निवडणुकीच्या निकालांनी पाकिस्तानची भीती आणखी वाढवली आहे.
दरम्यान, गुजरातमध्ये भाजप (BJP) रेकॉर्डतोड कामगिरी करत असताना, पाकिस्तानात भीतीचे वातावरण होते. इकडे मोदी भाजप कार्यालयातून विजयी भाषण देत होते, तेव्हा पाकिस्तानात गुजरातमधील निकालाची चर्चा सुरु होती. पीएम मोदींची भीती पाकिस्तानात इतकी दिसते की, पाकिस्तानातील प्रत्येक पत्रकार आणि एक्सपर्ट गुजरातच्या विजयाला मोदींचे 2024 मध्ये पुन्हा सत्तेत येणे असे म्हणू लागले आहेत.
तसेच, पाकिस्तानी एक्सपर्ट कमर चीमा म्हणाले की, 'पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातमध्ये मोठा विजय मिळाला आहे. भारतात नरेंद्र मोदींची (Narendra Modi) लोकप्रियता शिगेला पोहोचली आहे. त्यांनी त्यांचे गृहराज्य गुजरात सातव्यांदा जिंकले आहे. 2024 च्या निवडणुकीपूर्वी पंतप्रधान मोदींच्या लोकप्रियतेचा पाकिस्तानवर मोठा परिणाम होऊ शकतो.'
पाकिस्तानी मीडियाही गुजरात निवडणुकीवर लक्ष ठेवून आहे
केवळ तज्ज्ञच नाही तर पाकिस्तानी प्रसारमाध्यमांनीही गुजरातच्या निकालाबद्दल बोलायला सुरुवात केली होती. पाकिस्तानचे वृत्तपत्र डॉन (DAWN) ने देखील गुजरातच्या निवडणुकीचे ठळकपणे कव्हरेज केले. डॉनने एका लेखात लिहिले की, गुजरातमध्ये मोदींच्या जादूने त्यांच्या पक्षासाठी काम केले आणि पक्षाचा एकतर्फी विजय झाला.
दुसरीकडे, पाकिस्तानच्या ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’ या आणखी एका वृत्तपत्राने गुजरातचे निकाल येण्यापूर्वीच हेडलाइन लावली होती की, गुजरातमध्ये भाजपला ऐतिहासिक विजय मिळणार आहे. वृत्तपत्राने लिहिले की, 1995 पासून गुजरातमधील प्रत्येक निवडणूक भाजपने जिंकली आहे, 2014 मध्ये पंतप्रधान होण्यापूर्वी मोदी 13 वर्षे गुजरातचे मुख्यमंत्रीही होते.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.