Gujarat Bharuch Chemical Company Blast Dainik Gomantak
देश

Chemical Company Blast: भरुचमधील फार्मा कंपनीत भीषण स्फोट, हायड्रोजनेशन प्रक्रियेदरम्यान अपघात; 5 मृत्यू, 2 गंभीर जखमी

Gujarat Bharuch Chemical Company Blast: गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून हादरवून टाकणारी एक दुर्घटना समोर आली.

Manish Jadhav

Gujarat Bharuch Chemical Company Blast: गुजरातच्या भरुच जिल्ह्यातून हादरवून टाकणारी एक दुर्घटना समोर आली. जिल्ह्यातील वागरा येथील सायखा जीआयडीसी परिसरातील 'सिनझील फार्माकेम' या रासायनिक कंपनीत एक अत्यंत जोरदार स्फोट झाला. या भीषण दुर्घटनेत कंपनीत काम करणाऱ्या 5 कामगारांचा जागीच मृत्यू झाला, तर इतर 2 कामगार गंभीर स्वरुपात जखमी झाले. सर्व जखमींना तातडीने नजीकच्या रुग्णालयात हलवण्यात आले असून तिथे त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.

हा स्फोट इतका प्रचंड होता की, त्याचा आवाज अनेक किलोमीटर दूरपर्यंत ऐकू गेला, ज्यामुळे संपूर्ण परिसरात भीतीचे वातावरण पसरले. प्राथमिक माहितीनुसार, केमिकल प्लांटमध्ये हायड्रोजनेशन प्रक्रिया सुरु असताना अचानक हा मोठा अपघात (Accident) घडला. स्फोटाची तीव्रता इतकी प्रचंड होती की, प्लांटमधील अवजड यंत्रसामग्रीचे सुटे भाग आणि लोखंडी पत्रे दूरवर जाऊन पडले, ज्यामुळे तिथे काम करणाऱ्या कामगारांना सावरण्याची किंवा बाहेर पडण्याची कोणतीही संधी मिळाली नाही.

स्फोटाचा कानठळ्या बसवणारा आवाज ऐकताच आजूबाजूच्या इतर कंपन्या आणि रहिवासी क्षेत्रांमधील लोकांमध्ये एकच खळबळ उडाली आणि जीव वाचवण्यासाठी रस्त्यावर आले. कंपनीच्या आत कामात व्यस्त असलेल्या 5 कर्मचाऱ्यांचा या भीषण स्फोटात जागेवरच जीव गेला. घटनेची माहिती मिळताच स्थानिक प्रशासन, पोलीस पथक आणि अग्निशामक दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी दाखल झाल्या व युद्धपातळीवर मदत व बचाव कार्य हाती घेतले.

घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन औद्योगिक सुरक्षा आणि आरोग्य विभागाने तातडीने घटनास्थळी भेट देऊन सखोल चौकशी सुरु केली. कंपनीमध्ये सर्व कायदेशीर आणि औद्योगिक सुरक्षा मानकांचे योग्य पालन केले जात होते की, प्रशासनाच्या किंवा व्यवस्थापनाच्या कोणत्याही तांत्रिक हलगर्जीपणामुळे हा जीवघेणा स्फोट झाला, याची कसून तपासणी केली जात आहे. तपासाचा अहवाल हाती आल्यानंतर पोलीस आणि संबंधित यंत्रणांकडून कंपनी व्यवस्थापन व दोषी अधिकाऱ्यावर कठोर कायदेशीर कारवाई करण्याची जोरदार तयारी सुरु आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: ना पेट्रोलचा खर्च, ना ट्रॅफिक जामची चिंता! पठ्ठ्या थेट पॅरामोटरने जातो ऑफिसला; व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल

खरी कुजबुज: दोन पंच गेले कुणीकडे?

Delhi Capitals Bowling Coach: IPL 2027 पूर्वी दिल्ली कॅपिटल्सचा मास्टरस्ट्रोक! 761 आंतरराष्ट्रीय विकेट्स घेणाऱ्या दिग्गजाची बॉलिंग कोच म्हणून नियुक्ती

Kadamba Transport Strike: 'कदंब'च्या ईटीएमविरोधात 12 नोव्हेंबरला संपाचा इशारा; 2 हजारांहून अधिक कर्मचारी उतरणार?

Delhi Mumbai Expressway Accident: खाटूश्यामजींच्या दर्शनाला निघालेल्या प्रवाशांवर काळाचा घाला, दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर भीषण अपघात; 8 मृत्यू, 10 जखमी

SCROLL FOR NEXT