Gujarat Assembly Election 2022
Gujarat Assembly Election 2022 Dainik Gomantak
देश

Gujarat Assembly Election 2022 : गुजरात विधानसभेसाठी नोव्हेंबरमध्ये मतदान?

गोमन्तक डिजिटल टीम

Gujarat Assembly Election 2022 : पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांचे होम स्टेट असलेल्या गुजरातमध्ये यंदा विधानसभा निवडणूक (Gujrat Assembly Elections 2022) होणार आहे. सूत्रांच्या माहितीनुसार नोव्हेंबरमध्ये ही निवडणूक होऊ शकते. ऑक्टोबरमध्ये 22 किंवा 23 तारखेला निवडणूक कार्यक्रमाची घोषणा होऊ शकते. तर मतदान नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात होण्याची शक्यता आहे.

केंद्रीय मुख्य निवडणूक आयुक्त (Chief Election Commissioner) राजीव कुमार आणि निवडणूक आयुक्त अनुप चंद्रा पांडे यांच्या दोन दिवसीय गुजरात दौऱ्याला सोमवारी सुरुवात झाली. त्यांनी आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने प्रशासनाच्या तयारीचा आढावा घेतला. दरम्यान, गुजरात भाजपचे प्रदेशाध्यक्ष सी. आर. पाटील (C. R. Patil) यांनीही विधानसभा निवडणूक नोव्हेंबरमध्ये होईल, असा दावा केला आहे. नोव्हेंबरच्या चौथ्या आठवड्यापासून ते डिसेंबरअखेर ही निवडणूक प्रक्रिया चालू शकेल, अशी शक्यताही वर्तवली जात आहे.

राज्यात 1998 पासून भाजपची सत्ता आहे. गुजरात विधानसभेत एकूण 182 जागा आहेत. तर 92 ही बहुमताची मॅजिक फिगर आहे. 2017 मध्ये झालेल्या गत विधानसभा निवडणुकीत भाजपने 99 जागा जिंकल्या होत्या तर काँग्रेसनेही 77 जागा जिंकत भाजपला कडवी झुंज दिली होती. तथापि, गेल्या पाच वर्षांच्या काळात काँग्रेसचे अनेक आमदार भाजपवासी झालेले आहेत. त्यामुळे यावर्षी होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत गुजरातची जनता कुणाच्या पारड्यात आपलं मत टाकते हे पाहणंही तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.

आम आदमी पक्ष काँग्रेसची जागा घेणार?

गेल्या काही काळात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या आम आदमी पक्षाने देशभरात त्यांच्या पक्षाचा प्रभाव वाढवला आहे. गुजरात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगानेही 'आप'ने जोरदार तयारी केली आहे. केजरीवाल आणि सिसोदिया यांनी गुजरातमध्ये अनेक पत्रकार परिषदा घेत येथील भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले आहे. आपने प्रचारात आघाडी घेतली असून 'आप' आता गुजरातमध्ये काँग्रेसची जागा घेणार अशी हवा निर्माण झाली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

PM Modi ON UCC: ‘’गोव्यातील लोक एक सारखे कपडे घालतात का?’’ समान नागरी कायद्याच्या प्रश्नावर मोदी स्पष्टच बोलले

SSC Result 2024 : पेडणे तालुक्यातील ३२ पैकी १५ शाळांचा निकाल १०० टक्के

Land Grabbing Case: गोवा जमीन हडप प्रकरण; ईडीची 36 जणांविरोधात मनी लाँड्रिंगची तक्रार

Goa And Kokan Today's Live News: जेनिफर ऑलिवेरा यांचे सरपंचपद अबाधित

E-Vehicle : ई-वाहन खरेदीकडे ग्राहकांची पाठ; दरमहा ८२४ वाहनांची नोंद

SCROLL FOR NEXT