Ghulam Nabi यांच्याकडून डेमोक्रेटिक 'आझाद' पक्षाची घोषणा

पक्षाच्या ध्वजाचेही अनावरण; उर्दू, संस्कृत भाषेतील 1500 नावे आली होती
Ghulam Nabi Azad
Ghulam Nabi AzadDainik Gomantak
Published on
Updated on

Ghulam Nabi Azad : जम्मू आणि काश्मिरचे माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे पूर्वाश्रमीचे ज्येष्ठ नेते गुलाम नबी आझाद (Ghulam Nabi Azad) यांनी सोमवारी नवरात्रौत्सवाच्या पहिल्या दिवशी त्यांच्या नव्या पक्षाची स्थापना केली. डेमोक्रेटिक आझाद पार्टी (Democratic Azad Party) असे त्यांच्या पक्षाचे नाव आहे. पक्षाच्या ध्वजाचे अनावरणही त्यांनी केले. आझाद यांच्या पक्षाच्या ध्वजात (Party Flag) तीन रंगांचा समावेश आहे. आडव्या ध्वजात निळा, पांढरा आणि पिवळ्या रंगाचे तीन उभे पट्टे आहेत. (Ghulam Nabi Azad announces his new political party name and unveils new flag)

Ghulam Nabi Azad
Ind vs Aus: ऑस्ट्रेलियाविरूद्धच्या सामन्यात ऋषभ पंतला का वगळलं? रोहितने सांगितले कारण

रविवारी आझाद यांनी त्यांच्या पक्षाचे नेते आणि कामगारांची बैठक घेतली होती. त्यानंतर सोमवारी त्यांनी याबाबत घोषणा केली. आझाद म्हणाले की, आम्हाला असे नाव हवे होते जे लोकशाहीवादी, शांततावादी आणि स्वतंत्र वाटेल. माझ्या पक्षाच्या नावासाठी उर्दू, संस्कृत अशा भाषेतील जवळपास 1500 नावे माझ्याकडे आली होती. हिंदी आणि उर्दू या भाषांचे मिश्रण म्हणजे हिंदुस्थानी. ध्वजातील पिवळा रंग हा सृजनशीलता, विविधतेत एकता दर्शविणारा आहे. पांढरा रंग शांततेचे प्रतिक आणि निळा रंग स्वातंत्र्य, आकाशाची उंची आणि समुद्राची खोली दर्शविणारा आहे. पक्षाची विचारसरणी पक्षाच्या नावाप्रमाणेच असेल. धर्मनिरपेक्ष लोक पक्षात सहभागी होऊ शकतात.

Ghulam Nabi Azad
Goa Election मध्ये कोटीच्या कोटी उड्डाणे! TMC अव्वल, खर्च तब्बल...

73 वर्षीय आझाद यांनी 26 ऑगस्ट रोजी काँग्रेसचा (Congress) राजीनामा दिला होता. काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी (Rahul Gandhi) हेच त्यांच्या कार्यपद्धतीतून पक्षाला उद्ध्वस्त करत आहेत, अशी टीका करत त्यावेळीच त्यांनी नवा पक्ष स्थापन करणार असल्याची घोषणा केली होती. जम्मू-काश्मिरला पुन्हा राज्याचा दर्जा मिळवून देणे आणि भूमिपुत्रांना रोजगार, निवारा देणे हा पक्षाचा अजेंडा असेल, असे त्यांनी स्पष्ट केले होते. त्यावेळी काँग्रेसमधील जवळपास दोन डझनभर महत्वाच्या नेत्यांनीही आझाद यांच्या समर्थनात काँग्रेसचा राजीनामा दिला होता. यात माजी मुख्यमंत्री तारा चंद यांच्यासह माजी मंत्री, माजी आमदारांचाही समावेश होता. याशिवाय मेहबूबा मुफ्तींच्या पीडीपी आणि आणि अपनी पार्टी या पक्षातूनही दोन माजी आमदार आझाद यांना येऊन मिळाले होते.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com