Gujarat Drugs NCB Dainik Gomantak
देश

Gujarat Drugs Case: गुजरातमध्ये जहाजातून तब्बल ५०० किलो अमली पदार्थ जप्त, NCB- नौदलाची मोठी कारवाई

Iranian Boat 500 kg drugs seized: इराणमधून आलेल्या जहाजातून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून भरसमुद्रात भारताच्या तपासयंत्रणानी आंतरराष्ट्रीय ड्रगतस्करांना दणका दिला आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Gujarat NCB Seize 500 Kg Drugs Iranian Boat Arabian Sea

अहमदाबाद : गुजरातजवळील समुद्रात गुरुवारी रात्री अमलीपदार्थ नियंत्रण पथक म्हणजेच एनसीबी, नौदल आणि गुजरातच्या दहशतवादविरोधी पथकाने संयुक्त मोहीम राबवत तब्बल ५०० किलो ड्रग्ज जप्त केले आहे. इराणमधून आलेल्या जहाजातून हे अमली पदार्थ जप्त करण्यात आले असून भरसमुद्रात भारताच्या तपासयंत्रणानी आंतरराष्ट्रीय ड्रगतस्करांना दणका दिला आहे.

सागरी मार्गाद्वारे अमली पदार्थांची तस्करी करण्याचे प्रमाण वाढल्याने भारताच्या तपास यंत्रणा सतर्क झाल्या आहेत. गुरुवारी रात्री भारताच्या तपास यंत्रणांनी गुजरातजवळ अरबी समुद्रात इराणमधून आलेल्या जहाजावर संयुक्त मोहीम राबवली. जहाजावरील सर्वांना तपास अधिकाऱ्यांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आणि जहाज गुजरातच्या किनाऱ्यावर आणले. जहाजात तब्बल ५०० किलो अमली पदार्थ असून पोलिसांनी ड्रग्जचा हा साठा जप्त केला आहे.

ड्रग्ज तस्करीमागे पाकिस्तानचा हात आहे का, या दिशेनेही चौकशी सुरू असल्याचे इंग्रजी माध्यमांनी म्हटले आहे. दहशतवादी कारवायांसाठी आर्थिक रसद मिळावी, यासाठी पाकिस्तान ड्रग्ज तस्करीमध्ये सक्रीय असल्याचा संशय आहे.

आंतरराष्ट्रीय सागरी सीमा रेषेजवळ एक जहाज तपास यंत्रणांच्या रडारवर आले आणि त्यानंतर ही कारवाई करण्यात आली, अशी माहिती ANI या वृत्तसंस्थेने दिली. या बोटीतून ज्यांना ताब्यात घेण्यात आले, ते सर्व जण इराणचे नागरिक असल्याचे स्थानिक माध्यमांनी म्हटले आहे.

गेल्या महिनाभरात गुजरातमध्ये अमली पदार्थांचा साठा जप्त केल्याची ही दुसरी मोठी घटना आहे. गुजरात आणि दिल्ली पोलिसांच्या संयुक्त पथकाने गेल्या महिन्यात तब्बल पाच हजार कोटी रुपयांचे ५१८ किलो कोकेन जप्त केले होते. नशामुक्त अभियानांतर्गत ही कारवाई करण्यात आले होते. अंकलेश्वरमधील औषध कंपनीत ही कारवाई करण्यात आली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Battle of Galwan: रक्ताने माखलेला चेहरा, हातात धारदार शस्त्र अन् डोळ्यात देशभक्तीची चमक, 'गलवान'मधील सलमानचा पहिला लूक आला समोर

ED Goa: गोव्यात ईडीची झाडाझडती; 'सडा अर्बन'ची 1.05 कोटींची मालमत्ता तर जमीन हडप प्रकरणी संदीप वझरकर 3.19 कोटींची जमीन जप्त

Video: अप्रतिम अन् शानदार...! भर पावसात मुलांसोबत 'गजराज'नं लुटला क्रिकेटचा आनंद; सोशल मीडियावर व्हिडिओ व्हायरल

Goa: भर पावसात प्रवासी बोट नदीत बुडाली; बाहेर काढण्यासाठी गोवा सरकारने 11 दिवसांत खर्च केले 20 लाख रुपये

Multiple Organ Failure Diseases: एकाच आजारानं हृदय, यकृत अन् मूत्रपिंड खराब होऊ शकतं का? जाणून घ्या वैज्ञानिक कारण अन् प्रतिबंधात्मक उपाय

SCROLL FOR NEXT