दहशतवादी आणि पोलिसांची चकमक  Dainik Gomantak
देश

श्रीनगरच्या राजौरी कादल येथे दहशतवादी आणि पोलिसांची चकमक

ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाले आहेत.

दैनिक गोमन्तक

जम्मू-काश्मीरची (Jammu and Kashmir) राजधानी श्रीनगरमधील (Srinagar) राजौरी कडाल भागात दहशतवाद्यांच्या गोळीबारात एक वाहतूक पोलीस जखमी झाले आहेत. त्यांना तात्काळ रुग्णालयात नेण्यात आले आहे. गेल्या काही दिवसांपासून भारतीय लष्कराने खोऱ्यात दहशतवाद्यांविरोधात वेगाने कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे बौखलहाटमध्ये दहशतवाद्यांनी पोलीस (police) आणि सुरक्षा दलांना लक्ष्य करण्यास सुरुवात केली आहे. थंडीचा हंगाम सुरू झाल्याने दहशतवाद्यांची घुसखोरी वाढण्याचीही शक्यता आहे. त्याला सामोरे जाण्यासाठी लष्कर पूर्णपणे सज्ज आहे.

तसेच,याआधी 17 नोव्हेंबर रोजी जम्मू-काश्मीरच्या बारामुल्ला जिल्ह्यात दहशतवाद्यांनी केलेल्या ग्रेनेड हल्ल्यात केंद्रीय राखीव पोलीस दलाचे (CRPF) दोन जवान आणि एक नागरिक जखमी झाले होते. पोलीस अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उत्तर काश्मीर जिल्ह्यातील पट्टण भागातील पल्हालन चौकाजवळ सकाळी 11.15 वाजता दहशतवाद्यांनी(terrorists) ग्रेनेड हल्ला केला.त्यामध्ये ते जखमी झाले. नवाकडलच्या जमालता भागात संध्याकाळी दहशतवाद्यांनी पोलिस दलावर अंदाधुंद गोळीबार केला, त्यात एक पोलिस जखमी झाले, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

अली मशीद इदगाह भागात केला हल्ला

दहशतवाद्यांनी श्रीनगरच्या अली मस्जिद इदगाह भागात 10 नोव्हेंबर रोजी सुरक्षा दलांवर ग्रेनेड चा हल्ला केला. या हल्ल्यात एक नागरिक आणि एक पोलीस जखमी झाले. सूत्रांच्या माहितीनुसार, पोलीस कर्मचारी रजेवर होते. CRPF च्या 161 बटालियन कॅम्पजवळ दहशतवाद्यांनी ग्रेनेड (Grenades) फेकले होते. एजाज अहमद भट असे या हल्ल्यात जखमी झालेल्या नागरिकाचे नाव असून ते हवाल येथील रहिवासी आहेत. तर सज्जाद अहमद भट असे या पोलीस कर्मचाऱ्याचे नाव असून ते नरवरा ईदगाह येथील रहिवासी आहेत. दोघांनाही SAHMS रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. नागरिकाच्या चेहऱ्यावर तर पोलिस कर्मचाऱ्याच्या हाताला आणि पायाला दुखापत झाल्याचे सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT