SPG Dainik Gomantak
देश

PM Modi Security Changes: PM मोदींच्या सुरक्षेत मोठा बदल, ADG घेणार पंतप्रधानांच्या सुरक्षेची जबाबदारी!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ची कमांड आता भारतीय पोलीस सेवेतील अतिरिक्त महासंचालक (ADG) स्तरावरील अधिकाऱ्याकडे असेल.

Manish Jadhav

PM Modi Security SPG To Be Headed by ADG Rank Officer: पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या स्पेशल प्रोटेक्शन ग्रुप (SPG) ची कमांड आता भारतीय पोलीस सेवेतील अतिरिक्त महासंचालक (ADG) स्तरावरील अधिकाऱ्याकडे असेल.

तर कनिष्ठ अधिकाऱ्यांना आता सुरुवातीच्या 6 वर्षांच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्त केली जाईल.

विशेष संरक्षण दल कायदा, 1988 (1988 चा 34) अंतर्गत राजपत्र अधिसूचनेद्वारे जारी केलेल्या नियमांच्या आधारे गुरुवारी गृह मंत्रालयाने (MHA) ही जबाबदारी निश्चित केली आहे.

SPG बाबत नवीन नियम

केंद्रीय गृहमंत्र्यांच्या ताज्या अधिसूचनेनुसार, अखिल भारतीय सेवेतील अधिकाऱ्यांना केंद्र सरकारकडून प्रतिनियुक्तीवर एसपीजीमध्ये केंद्र सरकारमधील (Central Government) संबंधित दर्जाच्या अधिकाऱ्यांना लागू असलेल्या अटी आणि शर्तींवर नियुक्त केले जाईल.

त्यात पुढे असे म्हटले आहे की, पूर्वीप्रमाणे, एसपीजीचे मुख्यालय नवी दिल्लीत असेल. तसेच, केंद्र सरकारकडून भारतीय पोलिस सेवेतील अतिरिक्त पोलिस महासंचालकांच्या स्तरावर संचालक नियुक्त केले जातील.

आतापर्यंत, त्याचे प्रमुख महानिरीक्षक दर्जाचे अधिकारी होते. मात्र, याबाबतचे कोणतेही निश्चित नियम अद्याप जारी करण्यात आलेले नाहीत.

दुसऱ्या टर्मसाठी काय होणार?

त्याच अधिसूचनेनुसार, अखिल भारतीय सेवेतील अधिकारी वगळता एसपीजीचे इतर सदस्य सहा वर्षांच्या सुरुवातीच्या कालावधीसाठी प्रतिनियुक्तीवर नियुक्त केले जातील. संबंधित कारणांसाठी केंद्र सरकारच्या पूर्वपरवानगीने ते दुसऱ्या टर्मसाठी नियुक्त केली जाऊ शकतात.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT