Tina Ahuja Menstrual Health Dainik Gomantak
देश

Menstrual Health: "मुंबई, दिल्ली सोडल्यास खूप कमी मुली मासिक पाळीबद्दल बोलतात" टीना आहूजाच्या विधानामुळे चर्चेला उधाण

Tina Ahuja Menstrual Health: बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याची कन्या टीना हिने अलीकडेच केलेल्या मासिक पाळीबद्दलच्या विधानावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे.

Sameer Panditrao

बॉलीवूडचा प्रसिद्ध अभिनेता गोविंदा याची कन्या टीना हिने अलीकडेच केलेल्या मासिक पाळीबद्दलच्या विधानावरून सोशल मीडियावर बरीच चर्चा रंगली आहे. टीना अहुजा हिने मासिक पाळीच्या वेदना आणि शहरी जीवनशैली आणि मानसिक आरोग्याशी संबंध जोडला. . Hautterfly ला तिने दिलेल्या मुलाखतीनंतर तिच्या वक्तव्यामुळे आरोग्य, जीवनशैली आणि सांस्कृतिक संदर्भ यांच्यातील संबंधांबद्दल वादविवाद छेडले जात आहेत. टीना अहुजा ही स्वतः एक उद्योजिका आहे.

मासिक पाळीबद्दल स्वतःचे अनुभव व्यक्त करताना टीना म्हणाली की मी बराच काळ चंदिगढमध्ये राहिले आहे आणि आणि मुंबई आणि दिल्लीतील मुलींच्या तुलनेत खूप कमी मुलींना मासिक पाळीच्या त्रासाबद्दल बोलताना ऐकले आहे. पंजाब आणि इतर लहान शहरांतील महिलांना मासिक पाळी कधी येते किंवा रजोनिवृत्ती कधी येते हेही कळत नाही. काही मुलींना भरपूर त्रास होतो तर काही मुली या काळात मानिसक दृष्ट्या त्रास सहन करत असतात.

आरोग्याबद्दल बोलताना टीना हिने वडील गोविंदा यांच्याकडून कायम प्रेरणा मिळत असल्याचं सांगितलं, ती म्हणाली की गोविंदा यांनी अगदी किशोरीवस्थेपासून तिला तंदुरुस्त आरोग्यचे महत्व पटवून दिले होते. जुन्या आठवणी सांगताना ती म्हणाली की ते मला सांगायचा, ‘तुझे वजन कमी करा, तुझे पोट वाढत आहे,’”.

या मुलाखतीदरम्यान टीना अहुजाची आई आणि गोविंदाची पत्नी सुनीता आहुजा या देखील उपस्थित होत्या आणि त्यांनी लेकीच्या बोलण्याचे समर्थन केले. मासिक पाळीचा त्रास कमी व्हावा म्हणून आहारात काही बदल सुचवले जातात आणि याबाबतीत मुलींनी सतर्क राहावे तसेच वैद्यकीय सल्ला घेतल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ नये असा सल्ला सुनीता आहुजा यांनी दिला. याबद्दल बोलताना एक हलकीशी टिप्पणी जोडत, सुनीता यांनी विनोद करत म्हटलं की, “गोविंदा की बीवी सुनीता ने एक चमचा घी खाने बोला और हार्ट में ब्लॉकेज हो गया." असा नंतर मला दोष देऊ नका.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Nightclub Fire: 25 जणांचा बळी गेला, 40 दिवस उलटले; मुख्य सूत्रधार अजूनही गुलदस्त्यात, जबाबदारी एकामेकांवर ढकलण्‍याची संगीत खुर्ची

India America Trade War: "मोदींशी लवकरात लवकर बोला'', ट्रम्प यांना खासदारांचं पत्र, भारत-अमेरिका 'ट्रेड वॉर'मध्ये आता डाळींचा पेच, कोण घेणार पुढाकार?

Goa Politics: खरी कुजबुज; काल किती खून झाले?

Goa Latest Updates: कुडचडे येथे भीषण अपघात: कार आणि डंपरची समोरासमोर धडक; एक जखमी

Goa Airline Incentive Scheme: गोव्यात विमान कंपन्यांना मिळणार 'बुस्टर डोस'! नवीन मार्गांसाठी तगडं अनुदान; मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली 'एअरलाईन इन्सेन्टिव्ह' योजना

SCROLL FOR NEXT