Government Office Dainik Gomantak
देश

सरकारी कार्यालयातून बकरीने पळवली फाईल, अधिकाऱ्यांची पळापळ!

दैनिक गोमन्तक

कानपूरमधील एक शेळी सरकारी कार्यालयातून (Government Office) फाईल घेऊन पळून गेल्याने सोशल मीडियावर त्या व्हीडिओने धुमाकुळ घातला आहे. नेटकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणावरती हा व्हीडिओ शेअर केला जात आहे. फुटेजमध्ये चौबेपूर ऑफिसचा (office) एक कर्मचारी तोंडात कागद (Doucments) घेऊन पळून गेलेल्या शेळीच्या मागे धावताना दिसत आहे. शेळी कानपूर कार्यालयातील एका रिकाम्या खोलीत घुसण्यात यशस्वी झाली आणि काही मिनिटांनंतर काही कागदपत्रे तोंडात घट्ट धरून बाहेर आली. कार्यालयाबाहेर बसलेल्या काही कर्मचाऱ्यांना शेळी दिसल्याने गोंधळ उडाला.

एक कर्मचारी शेळीच्या मागे धावताना दिसला आणि दुसरा ओरडला, "अरे यार तू दे ते'' कर्मचारी शेवटी ती कागदपत्रे मिळवण्यात यशस्वी ठरले, परंतु शेळीने त्यापैकी काही कागदपत्रे चावली होती. चौबेपूर गटविकास अधिकारी (Officer) मनुलाल यादव यांनी सांगितले की, शेळी केवळ ऑफिस मधील न लागणारी कागदपत्रे घेऊन पळून गेली, अधिकृत कागदपत्रे नाही.

"शेळी कार्यालयाजवळील कँटीनमधून ती कागदपत्रे घेऊन पळून गेली. कर्मचारी कार्यालयाबाहेर बसल्याने शेळी कागदपत्रे घेऊन पळून जाण्यात यशस्वी झाल्याचेही त्यांनी सांगितले. कर्मचाऱ्यांना कार्यालयात बसून काम करण्याचे निर्देश दिले आहेत.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa LDC Recruitment Scam: 'पुरावे एकत्र करण्याचे काम सुरूच'; मोन्सेरात यांच्या मागणीवर सरदेसाईंचे प्रत्युत्तर

Bandra - Madgaon Express: कोकणासाठी रेल्वे मागतोय तुम्ही गोव्यासाठी देताय? वांद्रे-मडगाव एक्सप्रेसबाबत कोकणवासीय नाराज

Goa Today's News Live: ओल्ड गोवा येथे दुचाकीच्या अपघातात 17 वर्षीय तरुण ठार

Curchorem News: सरकारचा ‘कचरा तुमच्या दारी’ उपक्रम सुरु; कुडचडे कचरा समस्येवरुन अमित पाटकर यांचा टोला

खरी कुजबुज: नोकऱ्या कोणाला मिळतात?

SCROLL FOR NEXT