Gorkhas Rajbanshis Tribals United Front Seeking Separate State Of North Bengal Dainik Gomantak
देश

North Bengal: ''पश्चिम बंगालपासून वेगळे राज्य हवे...''; गोरखा, आदिवासींसह अनेक गट आले एकत्र

West Bengal: पश्चिम बंगालमध्ये वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. आता ही मागणी जोर धरु लागली आहे.

Manish Jadhav

Gorkhas Rajbanshis Tribals United Front Seeking Separate State Of North Bengal: पश्चिम बंगालमध्ये वेगळे राज्य निर्माण करण्याची मागणी अनेक दिवसांपासून होत आहे. आता ही मागणी जोर धरु लागली आहे. पुढच्या वर्षीच्या सुरुवातीला होणाऱ्या लोकसभा निवडणुकीच्या आधी, गोरखा, राजवंशी आणि आदिवासी गटांच्या विविध संघटनांनी स्वतंत्र उत्तर बंगाल राज्याच्या मागणीसाठी हातमिळवणी केली आहे.

किंबहुना, ज्या राजकीय पक्ष आणि संघटना वर्षानुवर्षे कामतापुरी, राजवंशी आणि गोरखांसाठी स्वतंत्र राज्याची मागणी करत होते, त्यांनी अलीकडेच पश्चिम बंगालमधील आठ जिल्ह्यांचा समावेश करुन वेगळ्या राज्याची मागणी करत 'युनायटेड फ्रंट फॉर अ सेपरेट स्टेट' ची स्थापन केली आहे.

मोर्चाचे पहिले पाऊल म्हणून राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांना लवकरच निवेदन सादर करण्याची योजना आहे.

वेगळ्या राज्यासाठी आंदोलन केले, आता सर्व एक झाले आहेत

द इंडियन एक्स्प्रेसच्या वृत्तानुसार, शुक्रवारी सिलीगुडी येथे मोर्चाची बैठक झाली. बैठकीत 20 डिसेंबरला दिल्लीत (Delhi) आंदोलन करण्याचा निर्णय घेण्यात आला. जानेवारीमध्ये सिलीगुडी, कूचबिहार आणि रायगंज (उत्तर दिनाजपूर) इथेही मोर्चा काढण्यात येणार आहे.

मोर्चाचे संयोजक आणि गोरखा जनमुक्ती मोर्चाचे केंद्रीय समिती सदस्य (बिमल गुरुंग) दीपेंद्र निरौला म्हणाले की, "याआधी वेगळ्या उत्तर बंगाल राज्यासाठी वेगवेगळ्या समुदायांनी अनेक आंदोलने केली होती. कामतापुरींनी वेगळ्या राज्यासाठी आंदोलन केले होते.

ग्रेटरसाठी आंदोलनही झाले होते. आम्ही वेगळ्या गोरखालँड राज्यासाठी आंदोलन केले. या प्रदेशाने तीन आंदोलने पाहिली. पण आता आम्ही सर्वांनी वेगळ्या उत्तर बंगाल राज्याच्या मागणीसाठी एकजूट केली आहे."

दरम्यान, या आघाडीत नऊ संघटना आहेत. यामध्ये कामतापूर प्रोग्रेसिव्ह पार्टी, जीजेएम (बिमल गुरुंग), कामतापूर पीपल्स पार्टी (युनायटेड), जॉय बिरसा मुंडा उलगुलन, एससी/एसटी मूव्हमेंट कमिटी, प्रोग्रेसिव्ह पीपल्स पार्टी, अखिल भारतीय राजवंशी समाज, ग्रेटर कूचबिहार पीपल्स असोसिएशन आणि भूमिपुत्र उन्नती समिती यांचा समावेश आहे.

एक्सप्रेसशी फोनवर बोलताना दीपेंद्र म्हणाले की, “आम्ही गेल्या एक वर्षापासून बोलत आहोत आणि या मुद्द्यावर एकमत झाले आहे. ऑक्टोबरमध्येच आम्ही मार्च काढला होता. वर्षानुवर्षे केंद्र आणि राज्य सरकारने आमच्या तक्रारी ऐकून घेतल्या नाहीत.

मात्र आता आम्ही सगळे एकत्र आहोत. उत्तर बंगालमध्ये कोणताही विकास झालेला नाही. इथे पायाभूत सुविधांचा विकास झालेला नाही. वैद्यकीय, आर्थिक किंवा शैक्षणिक क्षेत्रात विकास झाला नाही.''

स्वतंत्र राज्यात आठ लोकसभा मतदारसंघ आणि 54 विधानसभा मतदारसंघ असतील

दरम्यान, स्वतंत्र राज्यामध्ये आठ जिल्हे, आठ लोकसभा मतदारसंघ आणि 54 विधानसभा मतदारसंघांचा समावेश असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारने संसदेच्या आगामी हिवाळी अधिवेशनात आपल्या मागणीवर आपली भूमिका स्पष्ट करावी, अशी मोर्चाची इच्छा आहे.

दूरध्वनीवरुन बोलताना फ्रंटचे प्रवक्ते आणि कामतापूर पुरोगामी पक्षाचे नेते उत्तम रॉय म्हणाले की, “आघाडीतील अनेक पक्ष आणि संघटनांनी गेल्या काही वर्षांत भाजपला कोणत्या ना कोणत्या मार्गाने पाठिंबा दिला आहे. मात्र भाजपने (BJP) आम्हाला केवळ आश्वासने दिली. उत्तर बंगालसाठी काहीही केले नाही. संसदेचे हिवाळी अधिवेशन लवकरच सुरु होणार आहे.

राष्ट्रपती, पंतप्रधान आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना आम्ही पुन्हा एकदा निवेदन देणार आहोत. आम्ही त्यांच्या प्रतिक्रियेची वाट पाहू. आगामी लोकसभा निवडणुकीपूर्वी त्यांनी उत्तर द्यावे, अशी आमची इच्छा आहे.

आम्ही 20 डिसेंबरला दिल्लीत आंदोलन करणार आहोत, त्यानंतर 7 जानेवारीला सिलीगुडी, 24 जानेवारीला रायगंज आणि 28 जानेवारीला कूचबिहारमध्ये मेगा रॅली काढणार आहोत.''

1980 च्या दशकात गोरखालँड राज्यासाठी आंदोलन झाले

गोरखा नॅशनल लिबरेशन फ्रंट (GNLF) चे संस्थापक सुभाष घिसिंग यांनी 1980 च्या दशकात हिंसक चळवळीद्वारे वेगळ्या गोरखालँड राज्याची चळवळ प्रथम सुरु केली होती. घिसिंग यांचे विश्वासू सहकारी बिमल गुरुंग यांनी GNLF मधून वेगळे होऊन गोरखा जनमुक्ती मोर्चा (GJM) हा स्वतःचा पक्ष स्थापन केल्यानंतर ही मागणी पुन्हा उफाळून आली होती.

2017 मध्ये दार्जिलिंगच्या टेकड्यांमध्ये 104 दिवसांच्या बंद आणि हिंसक आंदोलनामुळे हा मुद्दा पुन्हा पेटला होता. गुरुंग आणि इतर नेत्यांवर UAPA च्या कलमांसह अनेक गुन्हे दाखल करण्यात आले होते. गुरुंग यांनी नंतर तृणमूल काँग्रेसला पाठिंबा जाहीर केला.

दुसरीकडे, कामतापुरीला कोच राजवंशी म्हणून ओळखले जाते. कूचबिहार जिल्ह्यातील लोकांचा हा अनुसूचित जातीचा समुदाय आहे, ज्यांनी उत्तर बंगालमधील आठपैकी सात जिल्हे आणि आसाममधील चार जिल्हे (कोक्राझार, बोंगाईगाव, धुबरी आणि गोलपारा) आणि बिहारमधील किशनगंज यांचा समावेश असलेल्या ''कामतापूर'' या वेगळ्या राज्यासाठी आंदोलन केले.

नेपाळमधील झापा जिल्ह्याचा समावेश आहे. 1995 मध्ये कामतापूर लिबरेशन ऑर्गनायझेशन (KLO) या सशस्त्र लढाऊ संघटनेच्या स्थापनेनंतर ही मागणी पहिल्यांदा उचलण्यात आली. तथापि, नेतृत्वाच्या संकटामुळे आणि KLO आणि ऑल कामतापूर स्टुडंट्स युनियन (AKSU) च्या अनेक कार्यकर्त्यांच्या अटकेमुळे 2000 च्या दशकाच्या सुरुवातीला चळवळ अयशस्वी झाली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Shubman Gill Century: शुभमन गिलचा धमाका! ठोकलं बॅक टू बॅक शतक, 'ही' अद्भुत कामगिरी करणारा ठरला पहिला भारतीय

Camel Tear: उंटाचे अश्रू सापाच्या विषावर गुणकारी, एक थेंब 26 सापांच्या विषावर ठरेल जालीम औषध; अभ्यासातून स्पष्ट

CO2 To Alcohol: विज्ञानाचा चमत्कार! कार्बनचे अल्कोहोलमध्ये रुपांतर करण्यात कोरियाच्या वैज्ञानिकांना यश

Anaya Bangar: 'पुरुषाच्या देहात एक कोमल स्त्री जगत होती'; अनाया बांगरने जागवल्या लिंगबदल काळातील नाजूक आठवणी

Goa Crime: पार्किंगचा वाद विकोपाला गेला, पर्ये सत्तरीत दोन तरुणांमध्ये तुंबळ हाणामारी; एकाला अटक

SCROLL FOR NEXT