West Bengal Chief Minister Mamata Banerjee: पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भारतीय जनता पक्षाला खुली धमकी दिली आहे. जर केंद्रीय एजन्सींनी त्यांच्या पक्षाच्या चार नेत्यांना अटक केली, तर राज्य पोलीस भाजपच्या आठ नेत्यांना अटक करतील.
कोलकाता येथे एका सभेला संबोधित करताना ममता बॅनर्जी यांनी भाजपला उघड इशारा देताना सांगितले की, "त्यांनी आमच्या चार आमदारांना तुरुंगात पाठवले, या विचाराने आमची संख्या कमी होईल.
जर त्यांनी माझ्या चार लोकांना भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात पाठवले, तर मी त्यांच्या आठ नेत्यांना खून आणि इतर प्रकरणांमध्ये तुरुंगात पाठवेन.''
दरम्यान, कोलकाता येथील नेताजी इनडोअर स्टेडियममध्ये पक्षाच्या नेत्यांच्या बैठकीला संबोधित करताना ममता बॅनर्जी (Mamata Banerjee) यांनी हे वक्तव्य केले. या बैठकीला शेकडो टीएमसी खासदार, आमदार आणि ब्लॉक आणि गाव पातळीवरील नेते उपस्थित होते. टीएमसीचे राष्ट्रीय सरचिटणीस यांनी या बैठकीला व्हर्च्युअली संबोधित केले.
ममता बॅनर्जी यांनी बैठकीला संबोधित करताना म्हटले की, ''केंद्राने सर्वांना केंद्रीय एजन्सीच्या धाकात ठेवले आहे. आज तुम्ही आनंदी आहात कारण आमच्या पक्षाचे नेते अनुब्रता मंडल, पार्थ चॅटर्जी, माणिक भट्टाचार्य, ज्योती प्रिया मल्लिक आणि इतर काही नेते तुरुंगात आहेत. ही परंपरा कायम राहणार, भविष्यात तुम्ही सत्तेत नसणार तेव्हा कुठे असणार?
तुम्हालाही तुरुंगाची हवा खावी लागणार?'' हे लक्षात घेण्याजोगे आहे की, विविध कथित घोटाळ्यांमध्ये अंमलबजावणी संचालनालय आणि केंद्रीय अन्वेषण ब्यूरोने अटक केल्यानंतर किमान पाच हाय-प्रोफाइल TMC नेते आता न्यायालयीन कोठडीत आहेत. यामध्ये चार आमदारांचाही समावेश असून त्यापैकी दोन राज्यमंत्री राहिले आहेत.
ममता बॅनर्जी पुढे म्हणाल्या की, "तुम्हाला (भाजप) वाटते की तुम्ही काहीही कराल कारण तुम्ही केंद्रात सत्तेत आहात. तुम्ही टीएमसी, अरविंद केजरीवाल, अशोक गेहलोत यांचा मुलगा आणि इतर नेत्यांवर ईडी आणि सीबीआयच्या माध्यमातून कारवाई करत आहात. येत्या काळात हेच अधिकारी तुमच्या मागे लागतील, त्यावेळी तुम्हाला कोणीही संरक्षण देणार नाही.''
ममता पुढे असेही म्हणाल्या की, "तुम्ही परदेशात जाऊन अनेक विमाने खरेदी केली. एक दिवस यासंबंधी प्रश्न उपस्थित होतील. एके दिवशी तुम्ही बोफोर्सबाबत राजीव गांधींवर प्रश्न उपस्थित केलेत. मी ती निवडणूक लढवली होती. बोफोर्सची खिल्ली उडवली गेली, घोटाळा केल्याची घोषणाबाजीही करण्यात आली. आता तुमचा सौदा काय होता? पैसे कुठे गेले?"
ममता बॅनर्जी यांच्या वक्तव्यावर भाजपने जोरदार हल्लाबोल केला. भाजपने म्हटले की, 'टीएमसी सुप्रिमो विरोधकांना धमकावू लागले आहेत.' भाजप नेते राहुल सिन्हा यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले की, ''आगामी काळात त्यांच्या पक्षाचे आणखी नेते भ्रष्टाचाराच्या आरोपाखाली तुरुंगात जातील.
या अटकेशी भाजप किंवा केंद्राचा काहीही संबंध नाही. हे सर्व न्यायालयाने आदेश दिलेले तपास आहेत. त्यांच्या पोलिसांनीही भाजप नेत्यांवर खटले दाखल करण्याचा प्रयत्न केला पण ते अपयशी ठरले."
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.