Congress leader BK Hariprasad Dainik Gomantak
देश

''गोध्रासारख्या दंगलीची भीती'', रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेत्याचं वादग्रस्त वक्तव्य

Congress leader BK Hariprasad: अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे.

Manish Jadhav

Congress Leader Controversial Statement: अयोध्येतील रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्यापूर्वी काँग्रेस नेते बीके हरिप्रसाद यांचे वादग्रस्त विधान समोर आले आहे. कर्नाटक काँग्रेसचे नेते बीके हरिप्रसाद म्हणाले की, 'राज्यात गोध्रासारखी दंगल घडू शकते.' याशिवाय अयोध्येला जाणाऱ्या लोकांना सुरक्षा पुरवण्याची मागणी त्यांनी केंद्र सरकारकडे केली आहे. त्यांनी रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याचे वर्णन राजकीय इव्हेंट म्हणून केले. काँग्रेस नेते पुढे म्हणाले की, 'लोकांच्या जीवित आणि मालमत्तेचे रक्षण करणे हे सरकारचे कर्तव्य आहे. 22 जानेवारीला अयोध्येतील राम मंदिरात होणाऱ्या कार्यक्रमादरम्यान कर्नाटकात गोध्रासारखी दंगल होऊ शकते.'

प्रसाद यांनी सिद्धरामय्या सरकारला सांगितले की, ''2002 मध्ये गुजरातमध्ये अशाच एका कार्यक्रमादरम्यान गोध्रामध्ये कारसेवकांना जिवंत जाळण्यात आले होते, त्याप्रमाणे आता सावध राहावे.'' काँग्रेस नेत्याच्या या विधानावरुन वाद निर्माण होणार हे निश्चित. हिंदुत्ववादी कार्यकर्ते श्रीकांत पुजारीच्या अटकेवरुन कर्नाटकात आधीच खळबळ उडाली आहे. हुबळी येथे 1992 च्या दंगलीप्रकरणी 60 वर्षीय श्रीकांत पुजारी यांना कर्नाटक पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. अयोध्येतील बाबरी मशीद पाडल्यानंतर राज्यात दंगल झाली होती. मात्र आता भाजपने या अटकेचा विरोध करत म्हटले की, कॉंग्रेस सरकार हिंदूंना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे.

दुसरीकडे, अयोध्येत होणाऱ्या कार्यक्रमाच्या निषेधार्थ कर्नाटक सरकारने हे पाऊल उचलल्याचा आरोप भाजपने केला आहे. तर काँग्रेस सरकारचे म्हणणे आहे की, ही कारवाई कायदेशीर आहे आणि सरकारची त्यात कोणतीही भूमिका नाही. भाजपतर्फे बुधवारी राज्यव्यापी निदर्शने करण्यात आली. काँग्रेसचे हे पाऊल हिंदुविरोधी असल्याचे पक्षप्रमुख बीवाय विजयेंद्र म्हणाले. अयोध्येत रामलल्लाच्या अभिषेक सोहळ्याची करोडो लोक वाट पाहत असताना पुजाऱ्याला अटक करणे हा हिंदूंचा अपमान असल्याचे विजयेंद्र यांनी म्हटले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Health Horoscope: साप्ताहिक आरोग्य राशीभविष्य 21 ते 27 सप्टेंबर 2026; 'या' 3 राशींची प्रकृती राहील ठणठणीत, तर काहींना तणाव आणि थकवा सतावण्याची शक्यता

Mahindra Thar 3-Door Facelift: ऑफ-रोडिंगचा दम कायम, पण लूक मॉडर्न! थार येतेय नव्या अवतारात! Roxxची झलक पाहायला मिळणार

Foreign Woman Viral Video: फोटो काढत होती परदेशी महिला, अचानक लोकांनी घेरलं; पुढे जे घडलं ते कॅमेऱ्यात कैद, पाहा व्हिडिओ

क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! Asian Games 2026 मध्ये IND vs PAK महामुकाबला होणार नाही; भारताची श्रीलंकेशी फायनलमध्ये लढत

Low BPची समस्या वारंवार होतेय? चक्कर, थकवा अन् मळमळकडे दुर्लक्ष करू नका; जाणून घ्या लक्षणे आणि उपाय

SCROLL FOR NEXT