Sunburn Festival 2024 Dainik Gomantak
देश

Sunburn Festival: 'सनबर्न'वर राहणार कडक नजर! चार पथके ठेवणार ध्वनी प्रदूषणावर लक्ष

Sunburn Festival 2024: ध्वनी नियमांचे उल्लंघन होते की नाही हे तपासण्याचे यंत्र जरी गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे असले तरी याचे प्रशिक्षण पोलिसांना देखील देण्यात आले आहे.

गोमन्तक डिजिटल टीम

Sunburn Festival Noise Pollution Monitor Team

पणजी: मोठ्या आवाजात पार्ट्या वाजत असेल तर ते रोखण्याचे काम पोलिसांचे आहे. पोलिसांनी ते करणे अपेक्षित आहे. ध्वनी नियमांचे उल्लंघन होते की नाही हे तपासण्याचे यंत्र जरी गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळाकडे असले तरी याचे प्रशिक्षण पोलिसांना देखील देण्यात आले आहे. सनबर्न येथे ध्वनी प्रदूषण नियमांचे उल्लंघन होत असेल तर ते तपासण्यासाठी आम्ही ४ टीम तयार केल्याची माहिती गोवा प्रदूषण नियंत्रण महामंडळ अध्यक्ष महेश पाटील यांनी दिली.

किनारी भागात प्रामुख्याने डिसेंबरमध्ये ध्वनी प्रदूषण होत असल्याच्या तक्रारी लोक करत असतात. आता वर्षाच्या अखेरीस किनारी भागात होणाऱ्या पार्ट्यांमुळे ध्वनी प्रदूषण होण्याची शक्यता आहे.

तीन रात्रींसाठी मुभा

१. ध्वनी प्रदूषणावर नियंत्रण ठेवण्यासाठी आणि पर्यटकांचा विचार करून दोन्ही बाजूचा समतोल राखण्याच्या दृष्टीने पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने २४ ते २६ आणि ३१ डिसेंबर रोजी रात्री १२ वाजेपर्यंत संगीत पार्ट्या करण्याची मुभा दिली आहे.

२. पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने प्रदूषण नियमावलीत बदल करून २०२४ मध्ये वरील उल्लेख केलेल्या चार रात्री १० ते १२ या वेळेत लाऊडस्पीकर वापरण्यास परवानगी दिली आहे.

३. या नियमांचे पालन होत आहे की नाही यावर नजर ठेवण्यासाठी संबंधित अधिकारी देखील नेमण्यात आले आहेत.

४. विभागाने परवानगी देण्याचे निश्चित केले असले तरी ठराविक परवानगी देण्याचे नियम बदलण्यात आले आहे. काहींना परवानगी केवळ ग्रामपंचायत, नगरपालिका किंवा राज्य सरकारने मान्यता दिलेल्या संस्थेच्या विनंतीवरच दिली जाईल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT