manipur church news Dainik Gomantak
देश

गोमंतकीय जोडप्याने मणिपूरात उभारले प्रार्थनास्थळ; मुनपी गावात पहिल्यावहिल्या 'सेंट जोसेफ चर्च'चे लोकार्पण!

Saint Joseph Church Munpi: जेरोनिमो परेरा आणि त्यांच्या पत्नी मेरी परेरा यांनी या दुर्गम भागात पहिलेवहिले 'सेंट जोसेफ चर्च' बांधले

Akshata Chhatre

Goa Couple Church Manipur: गोवा आणि मणिपूरमधील सामाजिक व धार्मिक बांधिलकी अधिक दृढ करणारा एक अत्यंत प्रेरणादायक क्षण नुकताच मणिपूरमधील दूरस्थ मुनपी गावात (सिंगाट, चुराचंदपूर जिल्हा) घडला आहे. थिवी येथील गोमंतकीय दाम्पत्य.

जेरोनिमो परेरा आणि त्यांच्या पत्नी मेरी परेरा यांनी या दुर्गम भागात पहिलेवहिले 'सेंट जोसेफ चर्च' बांधून स्थानिक कॅथोलिक समाजासाठी एक ऐतिहासिक टप्पा गाठला आहे. परेरा दाम्पत्याने 'स्ट्रीट प्रॉव्हिडन्स' या संस्थेच्या मदत कार्यातून प्रेरणा घेत हे कार्य पूर्ण केले आहे

मुनपी गावात 'सेंट जोसेफ चर्च'ची स्थापना

चर्चचे भव्य उद्घाटन आणि आशीर्वाद समारंभ शनिवार, १८ ऑक्टोबर २०२५ रोजी संपन्न झाला. मणिपूरचे निवृत्त आर्चबिशप रेव्ह. डॉमनिस्क ल्युमन यांच्या हस्ते चर्चला आशीर्वाद देण्यात आला. या ऐतिहासिक सोहळ्याला तब्बल १३ धर्मगुरू, अनेक नन्स, कॅटेकिस्ट आणि १,००० हून अधिक स्थानिक ग्रामस्थ उपस्थित होते.

याशिवाय, म्यानमार (बर्मा) येथूनही धर्मगुरू, नन्स आणि भाविक उपस्थित होते, ज्यामुळे या घटनेचे महत्त्व आंतरराष्ट्रीय स्तरावर पोहोचले. भक्तीपूर्ण पारंपरिक सांस्कृतिक कार्यक्रमासह या सोहळ्याची सांगता झाली.

विविध उद्घाटने आणि मानवतावादी कार्य

उद्घाटन सोहळ्यादरम्यान अनेक महत्त्वपूर्ण उपक्रम पार पडले. इम्फाल धर्मप्रांताचे व्हिकार जनरल फादर वर्गीस यांनी मदर मेरी ग्रोटोचे आशीर्वाद देऊन उद्घाटन केले, तर जेरोनिमो परेरा यांनी चर्चजवळ उभारलेल्या एका भव्य क्रॉसचे अनावरण केले.

दरम्यान डोनाल्ड फर्नांडिस यांच्या हस्ते ५०,००० लीटर क्षमतेच्या पाण्याची टाकीचे उद्घाटन करण्यात आले. ही पाण्याची टाकी चर्चशेजारी राहणाऱ्या विस्थापित कुटुंबांसाठी एक अत्यंत महत्त्वपूर्ण संसाधन ठरणार आहे, ज्यामुळे परेरा कुटुंबाच्या या उपक्रमाला सेवाभावी कार्याची किनार मिळाली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Grah Gochar 2026: 1 सप्टेंबरला बनणार 6 शक्तिशाली राजयोग! 'या' राशींची तिजोरी पैशांनी भरणार; होणार अफाट धन वर्षाव

Weather Update: ऑगस्टमध्ये समाधानकारक पाऊस, सर्वाधिक वाळपईत; जुलैमधील पावसाचा तुटवडा मात्र कायम

Marcel Road Issue: माशेलात 'वर्दळीचा' रस्ता धोकादायक, खड्ड्यांमुळे वाहतुकीला अडथळा; पावसात दुचाकीस्वारांसमोर मोठे संकट

Panaji: थकीत घरपट्टीचा फटका भाडेकरूंना; उत्पन्नाचा दाखला मिळविताना भाडेकरूंच्या मुलांची मोठी कसरत

Police Attack Viral Video: पीएसआयचा गळा आवळला, लोखंडी साखळीने हल्ला... लखनऊमध्ये अतिक्रमण हटवताना राडा; दोन महिलांसह 6 जणांना बेड्या

SCROLL FOR NEXT