Akshata Chhatre
तुम्ही कधी क्रॉस शिवाय असलेली चर्च पहिली आहे का?
आता तुम्हाला असं वाटेल की क्रॉस शिवाय चर्च कशी असेल, पण आज आम्ही तुम्हाला अशीच एक चर्च सांगणार आहोत.
गोव्यातील एक प्रसिद्ध चर्च म्हणजेच ओल्ड गोव्याची चर्च, मात्र तुम्हाला माहितीये का या चर्चच्या वर क्रॉस नाही.
ओल्ड गोव्यातील ही जुनी चर्च संत झेवियर यांना समर्पित आहे. दररोज अनेक भाविक आणि पर्यटक या चर्चला भेट देतात.
या चर्चच्या आजूबाजूला जर का फिरून तुम्ही पाहिलं तर चर्चच्या बाजूला एक क्रॉस ठेवलेला दिसेल.
जुन्या गोव्याची ही चर्च लाल चिऱ्यांपासून बनवली गेलीये मात्र त्याचा क्रॉस चर्च्यावर नाही.
दरवर्षी इथे ३ डिसेंबरच्या दिवशी फेस्त आयोजित केलं जातं.