Goa-Bhopal Flight Dainik Gomantak
देश

Goa-Bhopal Flight: एअर शोमुळे गोवा-भोपाळ फ्लाईटच्या वेळेत बदल; 1 ऑक्टोबरपर्यंत व्यवस्था

मुंबई-भोपाळ, उदयपूर-भोपाळ फ्लाईटच्या वेळापत्रकातही बदल

Akshay Nirmale

Goa-Bhopal Flight: भारतीय हवाई दलाच्या (एअरफोर्स) नियोजित एअर शो मुळे मध्यप्रदेशातील राजा भोज विमानतळावर येणाऱ्या तीन फ्लाईट्सच्या वेळापत्रकात तात्पुरता बदल करण्यात आला आहे. हा बदल 1 ऑक्टोबरपर्यंत असणार आहे.

राजा भोज विमानतळ हे मध्यप्रदेशची राजधानी भोपाळमधील विमानतळ आहे. भोपाळमध्ये हवाईदलाचा एअरशो होणार आहे. त्याचा सराव सुरू झाला आहे. त्यामुळे अनेक नियमित विमान उड्डाणांच्या वेळेत बदल करण्यात आला आहे.

तर काही उड्डाणे डायव्हर्ट केली आहेत. 30 सप्टेंबर रोजी एअरफोर्स डे आहे. भारतीय हवाईदलाच्या स्थापनेचा हा 91 वा वर्धापन दिन आहे. त्यानिमित्त येथे एअरशो होणार आहे

तात्पुरत्या वेळापत्रकानुसार, व्यवस्थापनाने इंडिगोच्या मुंबई मॉर्निंग फ्लाइटचे 6E-6549/5166 मुंबई-भोपाळ-मुंबई या फ्लाईटचे आगमन सकाळी 8:45 वाजता केले असून ही फ्लाईट सकाळी 9:15 वाजता प्रस्थान करेल.

त्याचप्रमाणे उदयपूर ते भोपाळ असा प्रवास करणारी 6E-7774/7973 फ्लाईट सकाळी 8:55 वाजता पोहोचेल आणि 9:20 वाजता निघेल. त्याचप्रमाणे गोव्याहून भोपाळला जाणाऱ्या 6E-6971/6972 फ्लाईटचे आगमन दुपारी 12:40 वाजता होईल आणि प्रस्थान दुपारी 1:10 वाजता होईल.

विमानतळाच्या वतीने ही माहिती प्रवाशांना त्यांच्या मोबाईल क्रमांकावर कळवली जात आहे. मंगळवारीच दिल्ली-भोपाळ फ्लाईट खराब हवामानामुळे जयपूर येथे डायव्हर्ट करण्यात आली होती. तसेच भोपाळ-दिल्ली फ्लाईटने दीड तास उशिराने उड्डाण केले होते.

कनेक्टिंग फ्लाईट सुटण्याची शक्यता असल्याने अनेक पर्यटकांना याचा फटका बसतो.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT