Glenn Maxwell  Dainik Gomantak
देश

AUS vs SA: टी-20 मध्ये ग्लेन मॅक्सवेल पुन्हा रचणार इतिहास! 'या' एलिट खेळाडूंच्या यादीत होणार सामील; घ्याव्या लागणार फक्त 'इतक्या' विकेट्स

Glenn Maxwell Record: ऑस्ट्रेलियाचा अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या निशाण्यावर दोन मोठे विक्रम आहेत. त्याला हे विक्रम करण्यासाठी केवळ काही पावले दूर आहेत.

Manish Jadhav

Glenn Maxwell Record: ऑस्ट्रेलिया आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील टी-20 मालिकेतील दुसरा सामना मंगळवारी (12 ऑगस्ट) डार्विन येथील मराणा क्रिकेट ग्राऊंडवर खेळला जाणार आहे. या महत्त्वाच्या सामन्यात ऑस्ट्रेलियाचा (Australia) अष्टपैलू खेळाडू ग्लेन मॅक्सवेलच्या निशाण्यावर दोन मोठे विक्रम आहेत. हे विक्रम करण्यासाठी तो केवळ काही पावले दूर आहे.

2500+ धावा आणि 50 बळी घेणारा चौथा खेळाडू

दरम्यान, टी-20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत केवळ तीनच खेळाडू असे आहेत, ज्यांनी 2500 किंवा त्याहून अधिक धावा आणि 50 पेक्षा जास्त बळी घेतले आहेत. या सामन्यात जर मॅक्सवेलने तीन बळी घेतले, तर तो हा ऐतिहासिक पराक्रम करणारा जगातील चौथा खेळाडू बनेल. आतापर्यंत हा विक्रम बांगलादेशचा अष्टपैलू खेळाडू शाकिब अल हसन, पाकिस्तानचा मोहम्मद हाफीज आणि मलेशियाचा वीरनदीप सिंग यांच्या नावावर आहे. मॅक्सवेलकडे आता या यादीत आपले नाव समाविष्ट करण्याची मोठी संधी आहे.

टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 2500+ धावा आणि 50+ बळी घेणारे खेळाडू:

  • शाकिब अल हसन: 129 सामने, 2551 धावा, 149 बळी

  • मोहम्मद हफीज: 119 सामने, 2514 धावा, 61 बळी

  • वीरनदीप सिंग: 102 सामने, 3013 धावा, 97 बळी

150 षटकारांचा विक्रमही नावावर करण्याची संधी

दरम्यान, दुसऱ्या टी-20 सामन्यात ग्लेन मॅक्सवेलच्या (Glenn Maxwell) नावावर आणखी एक मोठा विक्रम होण्याची शक्यता आहे. त्याला टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यांमध्ये 150 षटकार पूर्ण करण्यासाठी फक्त 5 षटकारांची आवश्यकता आहे. पाच षटकार मारताच तो ऑस्ट्रेलियाचा पहिला आणि जगातील पाचवा खेळाडू ठरेल, ज्याने 150 किंवा त्याहून अधिक षटकार मारले आहेत. सध्या रोहित शर्मा, मार्टिन गुप्टिल, मोहम्मद वसीम आणि जोस बटलर यांच्या नावावर हा विक्रम आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळवारचा दिवस महाशुभयोगाचा! 'या' 5 भाग्यवान राशींवर राहणार बजरंगबलीची कृपादृष्टी, धनालाभासह मिळणार नशिबाचीही साथ

Viral Video: धावत्या ट्रेनला लटकून स्टंटबाजी! 'हीरो' बनणाऱ्या पठ्ठ्याची मोडली खोड; नेटकऱ्यांनी उडवली खिल्ली, म्हणाले, 'बरं झालं...'

Santa Cruz Bogus Voters: निवडणूक आयोगाविरोधात गोव्यातही काँग्रेसचा एल्गार! सांताक्रुझ मतदारसंघात 3 हजार बोगस मतदार

Goa Tribal Reservation Bill: आदिवासींसाठी 'सोनियाचा दिनु', राजकीय आरक्षण विधेयक राज्यसभेतही मंजूर; अनेक वर्षांच्या लढ्याला यश

Angaraki Sankashti Chaturthi: कर्ज आणि रोगांपासून मुक्ती हवी? जाणून घ्या अंगारकी चतुर्थीचा शुभ मुहूर्त आणि महत्त्व

SCROLL FOR NEXT