Dainik Gomantak
देश

Glass Bottle Danger: काचेच्या बाटल्या प्लास्टिकपेक्षाही धोकादायक; नव्या संशोधनाने मायक्रोप्लास्टिकबाबत चिंता वाढली

Microplastic in Glass: आपण प्लास्टिकच्या बाटल्या आरोग्यासाठी हानिकारक मानत आलो आहोत, पण फ्रान्सच्या अन्न सुरक्षा संस्थेच्या एका नव्या संशोधनाने या धारणेला धक्का दिला

Akshata Chhatre

Plastic vs Glass Bottles: आतापर्यंत आपण प्लास्टिकच्या बाटल्या आरोग्यासाठी हानिकारक मानत आलो आहोत. पण फ्रान्सच्या अन्न सुरक्षा संस्थेच्या एका नव्या संशोधनाने या धारणेला धक्का दिला आहे. त्यांच्या दाव्यानुसार, काचेच्या बाटल्यांमध्ये प्लास्टिकच्या बाटल्यांपेक्षा लक्षणीयरीत्या अधिक 'मायक्रोप्लास्टिक्स' आढळतात. हे निष्कर्ष जुन्या समजुतींना थेट छेद देणारे आहेत.

संशोधनाचे धक्कादायक निष्कर्ष

'जर्नल ऑफ फूड कंपोझिशन अँड ॲनालिसिस'मध्ये प्रकाशित झालेल्या या निष्कर्षांनुसार, संशोधकांना सुरुवातीला काचेच्या बाटल्या प्लास्टिकच्या बाटल्यांपेक्षा सुरक्षित असतील अशी अपेक्षा होती, पण निकाल अनपेक्षित निघाले. "आम्हाला याउलट परिणाम अपेक्षित होता," असे या संशोधनाचे नेतृत्व करणाऱ्या पीएचडी विद्यार्थिनी आयझेलिन चैब यांनी सांगितले.

या संशोधनानुसार, मऊ पेये, लेमोनेड, आईस टी आणि बिअरच्या काचेच्या बाटल्यांमध्ये प्रति लिटर सरासरी १०० मायक्रोप्लास्टिक कण आढळले, जे प्लास्टिक किंवा धातूच्या डब्यांपेक्षा ५० पट जास्त होते.

बाटल्यांची झाकणे मुख्य स्रोत?

संशोधकांनी सांगितले की, बाटल्यांची झाकणे हे मायक्रोप्लास्टिक दूषित होण्याचे मुख्य कारण असावे असा संशय आहे. कारण, पेयांमध्ये सापडलेल्या बहुसंख्य कणांचा रंग झाकणांच्या रंगाशी जुळत होता आणि त्यांची रासायनिक रचनाही झाकणांच्या बाहेरील रंगासारखीच होती. "आम्ही पाहिले की, काचेच्या बाटल्यांमधून मिळालेल्या कणांचा आकार, रंग आणि पॉलिमर रचना ही बाटल्यांना सील करणाऱ्या झाकणांच्या बाहेरील रंगासारखीच होती.

सर्व प्रकारच्या बाटल्यांमध्ये, बिअरच्या बाटल्यांमध्ये मायक्रोप्लास्टिकची संख्या सर्वाधिक होती, प्रति लिटर सरासरी ६० कण. त्यानंतर लेमोनेडमध्ये सुमारे ४० टक्के कण आढळले. सामान्य आणि कार्बोनेटेड पाण्यात मात्र सर्व प्रकारच्या पॅकेजिंगमध्ये मायक्रोप्लास्टिकचे प्रमाण तुलनेने कमी होते: काचेच्या बाटल्यांमध्ये प्रति लिटर सुमारे ४.५ कण, तर प्लास्टिकच्या बाटल्यांमध्ये १.६ कण आढळून आले.

संशोधकांनी नमूद केले की, "वाईन वगळता इतर सर्व पेयांसाठी काचेची भांडी इतर पॅकेजिंगपेक्षा जास्त दूषित आढळली, कारण वाईनच्या बाटल्या धातूच्या झाकणांऐवजी कॉर्क स्टॉपर्सने बंद केलेल्या असतात."

ANSES चे संशोधन संचालक गिल्लाऊम ड्युफ्लोस म्हणाले की, या विरोधाभासाचे कारण सध्या तरी स्पष्ट नाही. मात्र, एजन्सीने या समस्येवर एक संभाव्य उपाय शोधला आहे. अभ्यासात असे म्हटले आहे की, बाटल्यांना हवा मारून आणि पाणी/इथेनॉल/पाण्याने धुतल्यास मायक्रोप्लास्टिक्सची संख्या लक्षणीयरीत्या कमी होते.

मायक्रोप्लास्टिक्सचा वाढता धोका

१९५० च्या दशकात १.५ दशलक्ष टन असलेल्या प्लास्टिकचे उत्पादन २०२२ मध्ये ४००.३ दशलक्ष टनांपर्यंत वाढले आहे. मात्र, 'सिंगल-यूज' प्लास्टिकच्या वाढत्या वापरामुळे आणि अपुऱ्या कचरा व्यवस्थापनामुळे जमीन आणि जलचरांत कचरा मोठ्या प्रमाणात वाढला आहे. पाच मिलिमीटरपेक्षा लहान असलेले हे सूक्ष्म प्लास्टिकचे कण मारियाना ट्रेंचपासून माऊंट एव्हरेस्टपर्यंत सर्वत्र आढळले आहेत. ते मानवी मेंदूत, गर्भाशयात आणि समुद्रातील खोल माशांच्या पोटातही सापडले आहेत, ज्यामुळे त्यांच्या धोक्याची गांभीर्यता अधोरेखित होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Charter Flight: पर्यटन हंगामाची दणक्यात सुरुवात! रशियातून पहिले चार्टर विमान मोपा विमानतळावर दाखल; गोव्याचे पारंपरिक आदरातिथ्य

Bethora Road Issue: बेतोड्यातील रस्त्यांची अवस्था दयनीय

Goa Politics: खरी कुजबुज, मायकल जागे झाले!

Asia Cup Controversy: पाकडे रडतच बसणार... "कप देतो, पण माझ्याकडूनच घ्यावा लागेल" नक्वींचा बालहट्ट काय

Goa Politics: 'ओठांवर गांधी, मनात नथुराम' काँग्रेस-भाजपमध्ये जुंपली! "राजकारणात RSSला ओढू नका" वेर्णेकरांचा पटकरांना कडक इशारा

SCROLL FOR NEXT