S-400 Dainik Gomantak
देश

चीन, पाकिस्तानला आव्हान देण्यासाठी भारत तैनात करणार 'S-400'

चीन (China) आणि पाकिस्तानचा धोका लक्षात घेता भारत पुढील महिन्यात रशियन बनावटीची S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आपल्या संरक्षणात तैनात करु शकतो.

दैनिक गोमन्तक

चीन आणि पाकिस्तानचा धोका लक्षात घेता भारत पुढील महिन्यात रशियन बनावटीची S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली आपल्या संरक्षणात तैनात करु शकतो. भारत हवाई दल, लष्कर, नौदल आणि सामरिक आण्विक दलांचे वेगाने आधुनिकीकरण करत आहे. अमेरिकेच्या संरक्षण मंत्रालयाच्या वरिष्ठ गुप्तचर अधिकाऱ्याने संसदीय सुनावणीदरम्यान ही माहिती दिली आहे. (Given the threat posed by China and Pakistan India could deploy a Russian-made S-400 missile)

दरम्यान, भारताला गेल्या वर्षी डिसेंबरपासून रशियाकडून S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली मिळण्यास सुरुवात झाली. संरक्षण गुप्तचर संस्थेचे संचालक लेफ्टनंट जनरल स्कॉट बॅरियर यांनी अमेरिकन संसदेच्या सशस्त्र सेवा समितीसमोर नुकत्याच झालेल्या सुनावणीदरम्यान ही माहिती दिली. रशियाकडून (Russia) S-400 क्षेपणास्त्र संरक्षण प्रणाली खरेदी करण्यासाठी अमेरिका भारताला सातत्याने इशारा देत आहे.

तसेच, ऑक्टोबर 2021 पर्यंत, भारत आपली भू-सीमा आणि सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी अत्याधुनिक सिस्टीम मिळविण्याचा विचार करत होते. यासोबतच आक्रमण आणि संरक्षणात्मक सायबर क्षमतेला चालना देण्यासाठीही काम सुरु असल्याचे सांगण्यात येत आहे.

लेफ्टनंट जनरल बॅरियर म्हणाले, "डिसेंबरमध्ये भारताला S-400 हवाई संरक्षण प्रणालीची प्रारंभिक डिलिव्हरी मिळाली. जून 2022 पर्यंत पाकिस्तानी आणि चिनी धोक्यांना लक्षात घेता याचा वापर करण्याचा भारताचा मानस आहे."

ते पुढे म्हणाले, "भारत (India) आपली हायपरसॉनिक, बॅलिस्टिक, क्रूझ आणि हवाई संरक्षण क्षेपणास्त्र क्षमता विकसित करत आहे. भारताने 2021 पासून अनेक चाचण्या घेतल्या आहेत. भारताकडे अनेक उपग्रह कार्यरत आहेत. ते आपल्या अंतराळ संसाधनांवर काम करत आहे. त्याचबरोबर भारत अवकाशातून हल्ला करण्याच्या क्षमतेवरही काम करत असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात येत आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bicholim: '..देवाजीच्या दारी आज रंगला अभंग'! पंढरपूरचे दाम्पत्य गोव्यात दाखल; 25 वर्षांपासून देतेय गणेशभक्तांना सेवा

Goa Assmbly Live: पार्से पंचायत क्षेत्रात 30 लाख खर्च करून दोन वीज ट्रासफॉर्मर उभारण्यात आले

Mopa Airport: मोपावर वर्दळ वाढली! आठवड्याला 714 विमानांची ये-जा; मंत्री मुरलीधर मोहोळ यांनी दिली माहिती

Weekly Horoscope: छोटीशी मेहनतच तुम्हाला मोठ्या यशाकडे घेऊन जाईल 'या' राशींसाठी हा आठवडा ठरणार खास; जाणून घ्या तुमचे भविष्य

Chimbel: '13 घरे नकाशातून केली गायब'! चिंबलवासीयांचा आरोप; 4.5 लाख चौमी जमीन हडप करण्‍याचा डाव असल्याचा दावा

SCROLL FOR NEXT