Gitanjali Aiyar Passed Away Dainik Gomantak
देश

Gitanjali Aiyar Passed Away: दूरदर्शनच्या प्रसिद्ध अँकर गीतांजली अय्यर यांचे निधन

दूरदर्शनच्या प्रसिद्ध न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे बुधवारी (7 जून)ला निधन झाले.

Puja Bonkile

Gitanjali Aiyar Passed Away: दूरदर्शनच्या प्रसिद्ध न्यूज अँकर गीतांजली अय्यर यांचे बुधवारी (7 जून) निधन झाले. त्या 76 वर्षांच्या होत्या. 30 वर्षांहून अधिक काळ त्यांनी दूरदर्शनमध्ये काम केले. अय्यर यांच्या निधनामुळे चाहत्यांमध्ये शोककळा पसरली आहे.

सोशल मीडियावर अय्यर यांना श्रद्धांजली वाहताना अनेक लोक त्यांच्या कुटुंबीयांप्रती शोक व्यक्त करत आहेत. केंद्रीय क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनीही गीतांजली अय्यर यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

  • क्रीडा मंत्री अनुराग ठाकूर यांनी शोक व्यक्त केला

क्रीडा मंत्री अनुराग ठाकुर यांनी ट्विट केले की, "दूरदर्शन आणि ऑल इंडिया रेडिओवरील पहिल्या आणि सर्वोत्तम इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक असलेल्या गीतांजली अय्यर यांच्या निधनाबद्दल ऐकून खूप दुःख झाले. 

एक मार्गदर्शक आणि पायनियर, त्यांनी पत्रकारिता आणि प्रसारण उद्योगात एक अमिट छाप सोडत प्रत्येक बातमीत विश्वासार्हता, व्यावसायिकता आणि एक वेगळा आवाज आणला. या कठीण काळात त्यांच्या कुटुंबियांसोबत आणि प्रियजनांसोबत माझ्या हार्दिक संवेदना आहेत. ओम शांती.''

  • गीतांजली अय्यर यांच्याबद्द्ल ...

गीतांजली अय्यर यांनी कोलकाता येथील लोरेटो कॉलेजमधून ग्रॅज्युएशन केले. त्यांनी नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून डिप्लोमाही केला. त्या देशातील पहिल्या इंग्रजी न्यूज अँकरपैकी एक होत्या. 

अय्यर 1971 मध्ये दूरदर्शनवर रुजू झाल्या आणि चॅनलमधील कारकिर्दीत चार वेळा त्यांना सर्वोत्कृष्ट अँकरचा पुरस्कार मिळाला. 1989 मध्ये त्यांना उत्कृष्ट महिलांच्या सन्मानार्थ दिला जाणारा इंदिरा गांधी प्रियदर्शिनी पुरस्कारही मिळाला.

वृत्त उद्योगातील दीर्घ कारकीर्दीनंतर, त्यांनी कॉर्पोरेट कम्युनिकेशन्स, सरकारी संबंध आणि विपणन क्षेत्रात प्रवेश केला. त्या भारतातील 'वर्ल्ड वाइड फंडा' च्या प्रमुख देणगीदारांच्या प्रमुख होत्या. श्रीधर क्षीरसागर यांच्या 'खानदान' या टीव्ही मालिकेतही त्यांनी काम केले होते.

याशिवाय जाहिरात क्षेत्रातही त्या सक्रियपणे वावरल्या. गीतांजली यांनी त्या काळातील अनेक ब्रँडसाठी काम केले होते. त्यांच्या निधनाने पत्रकारिता विश्वात शोकळला पसरली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: ट्राफिक जॅमची समस्या विसरा… गोव्यात 4 जलमार्गांवर सुरु होणार वॉटर टॅक्सी सेवा; थेट पाण्यातून करता येणार प्रवास

Rajinikanth's Guru: हिमालयात गूढ गुहेत राहणारे, महादेवाचे अवतार मानले जाणारे 'रजनीकांत' यांचे अध्यात्मिक गुरु कोण आहेत?

Zuari Bridge Car Accident: झुआरी पुलावर बीएमडब्ल्यू कारचा अपघात; सुदैवाने जीवितहानी टळली

भिवपाची गरज आसा! गोव्यात कामगारांची पिळवणूक; विविध मागण्यांसाठी अंगणवाडी कर्मचारी आझाद मैदानावर एकवटले

Hydroponic Farming: हायड्रोपोनिक्स! मातीविरहित शेती शिका, घरच्याघरी भाज्या मिळवा..

SCROLL FOR NEXT